एक वर्षानंतर झाले या खेळाडूचे भारतीय संघात पुनरागमन

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज पहिला टी २० सामना सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

आज भारताच्या ११ जणांच्या संघात सुरेश रैनाला स्थान मिळाले आहे. त्याने १ वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. याआधी त्याने १ फेब्रुवारी २०१७ मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला होता.

त्याने काही दिवसांपूर्वी सईद मुस्ताक अली टी २० ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने यास्पर्धेत बंगालविरुद्ध ५९ चेंडूत १२६ धावांची खेळी केली होती. तसेच बडोदा आणि तामिळनाडू विरुद्ध अर्धशतकी खेळी केल्या होत्या.

याच कामगिरीच्या जोरावर त्याला भारताच्या टी २० संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.

तसेच आज भारतीय संघात जयदेव उनाडकटलाही संधी देण्यात अली आहे. मागील काही महिण्यापासून त्याचीही कामगिरी भारताकडून उत्तम झाली आहे.

याबरोबरच दक्षिण आफ्रिकेच्या ११ जणांच्या संघात आज त्यांचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सला गुडघा दुखापतीमुळे संधी मिळालेली नाही.

असा आहे पहिल्या टी २० सामन्यासाठी ११ जणांचा संघ:

भारतीय संघ:
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार),शिखर धवन, सुरेश रैना, एम एस धोनी, हार्दिक पंड्या, मनीष पांडे, युजवेंद्र चहल,भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट.

जेपी ड्युमिनी(कर्णधार), फरहान बेहार्डीन, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरीस,अँडिल फेहलूकवयो, ताब्राईझ शम्सी, जुनिअर डाला,रिझा हेन्ड्रिक्स, डेन पीटरसन,जे जे स्मटस.