तब्बल ३२७ महिन्यांनतर इंग्लंडच्या संघाने केला असा मोठा पराक्रम

बर्मिंगहॅम। गुरुवारी(11 जूलै) 2019 क्रिकेट विश्वचषकात एजबस्टर्न स्टेडीयमवर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 8 विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

इंग्लंडने 1992 च्या विश्वचषकानंतर म्हणजेच तब्बल 327 महिन्यांनंतर पहिल्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. इंग्लंडची विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची ही एकूण चौथी वेळ आहे.

याआधी इंग्लंडने 1979, 1987 आणि 1992 च्या विश्वचषकांच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र या तिन्ही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

विशेष म्हणजे इंग्लंडची यावर्षीची जर्सीही 1992 च्या विश्वचषकात संघाने केलेल्या कामगिरीच्या प्रेरणेतून त्यावेळीच्या जर्सीप्रमाणेच करण्यात आली आहे.

गुरुवारी झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्वबाद 223 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक 85 धावांची खेळी केली होती. तर ऍलेक्स कॅरेने 46 धावांची छोटेखानी चांगली खेळी केली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि आदिल राशिदने सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून सलामीवीर फलंदाज जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोने आक्रमक सुरुवात करताना 17.2 षटकात 124 धावांची सलामी भागीदारी रचली आणि इंग्लंडला भक्कम सुरुवात करुन दिली. मात्र बेअरस्टो 34 धावा करुन बाद झाला. तर रॉयने 65 चेंडूत 85 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.

तो बाद झाल्यानंतर कर्णधार इयान मॉर्गन(45*) आणि जो रुटने(49*) फलंदाजीची जबाबदारी हाती घेत एकही विकेट नंतर जाऊ दिली नाही आणि 32.1 षटकातच इंग्लंडला 226 धावांचा टप्पा गाठून देत विजयही मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडला फायनलमध्ये पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचललेल्या रॉयला झाली ही मोठी शिक्षा

खेळाडूंचा फिटनेस सांभाळणाऱ्या पॅट्रिक फऱ्हाट यांचा टीम इंडियाला अलविदा

लता मंगेशकरांची धोनीला मोठी विनंती, ‘धोनी, असे करु नको’