- Advertisement -

आयपीएल लिलाव: ७ वर्षांनी हा खेळाडू परतला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात

0 64

बंगलोरमध्ये आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी लिलाव सुरु आहे. या लिलावात अनेक मोठ्या भारतीय खेळाडूंबरोबरच परदेशी खेळाडूही लिलावासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे फ्रॅन्चायझींमध्ये स्पर्धा बघायला मिळत आहे.

या लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्यांचा कर्णधार गौतम गंभीरला कायम केले नसल्याने तो लिलावात उपलब्ध होता. त्यामुळे त्याला या लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने २.८ करोडला खरेदी केले आहे.

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने गंभीरला खरेदी केल्याने तब्बल ७ वर्षांनी तो पुन्हा आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळताना दिसणार आहे. गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघाने २ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच गंभीर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

गौतमने याबद्दल ट्विट केले आहे.

 

Comments
Loading...
%d bloggers like this: