लॉर्ड्स कसोटीः भारतीय गोलंदाजांची कमाल, इंग्लंडच्या आघाडीच्या फळीला खिंडार

लंडन | भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने उपहाराला ४ बाद ८९ धावा केल्या आहेत. इंग्लंडचे अॅलस्टर कूक, जो रुट, क्विटाॅन जेनिंग्ज आणि ओली पोप हे फलंदाज तंबूत परतले आहे.

भारताकडून मोहम्मद शमीने २ तर इशांत शर्मा आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी १ विकेट घेतली आहे. तर इंग्लंडकडून उपहारापर्यंत बाद झालेल्या फलंदाजांत अॅलस्टर कूक(२१), जो रुट(१९), क्विटाॅन जेनिंग्ज(११) आणि ओली पोप (२८) यांनी धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर जाॅनी बेअरस्ट्रो १० चेंडूत ४ धावांवर खेळत आहे.

भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद १०७ धावा केल्या असून इंग्लंडचा संघ अजूनही १८ धावांनी पिछाडीवर आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस अजून आजचे दोन सत्र बाकी आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक

जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी

लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते