पहा शाहरुख खानच्या नवीन टी२० संघाचा लोगो !

बॉलीवूड किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानने क्रिकेटच्या वेगवेगळ्या खंडात चालणाऱ्या लीगमधील ३ टीम खरेदी केल्या आहेत हे आता सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी नवीन गोष्ट राहिली नाही.

इंडियन प्रीमियर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स, कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिबंगो नाईट रायडर्स आणि टी२० ग्लोबल लीगमधील केप टाउन नाईट रायडर्स हे ते तीन संघ.

तर या संघाच्या अधिकृत लोगोचे अनावरण झाले आहे. याबरोबर शाहरुख खानने एक खास संदेशही दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून केप टाउन नाईट रायडर्स खात्यावरून ही शाहरुख खानने हा संदेश दिला आहे.

शाहरुख म्हणतो, ” हॅलो दक्षिण आफ्रिका आणि हॅलो केप टाउन! नाईट रायडर्स परिवाराकडून मी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे अभिनंदन करतो. त्यांनी टी२० ग्लोबल लीग सारख्या लीगची सुरुवात केली. नाईट रायडर्स परिवाराला या लीगमध्ये सामील करून घेतल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.”

“आम्ही या प्रवासाचे सहयात्री होण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही कोलकाता आणि त्रिनिनाद आणि टोबॅकोमधील सर्व चाहत्यांचे आभारी आहोत. केप टाउन आपणांकडूनही आम्हास असच प्रेम मिळेल. ”