जाणून घ्या का विराट कोहलीने दिली आफ्रिदीला बॅट गिफ्ट?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानच्या माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या चॅरिटी’ फंडला स्वतःची बॅट दान केली आहे. आफ्रिदीने मंगळवारी संध्याकाळी या बद्दल ट्विट केले आणि भारतीय क्रिकेट सुपरस्टारने अर्थातच विराटने लगेच त्याला रिप्लाय दिला.

सध्या सुरू असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत असलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये शाहिद आफ्रिकाला तसेच त्याच्या फॉउंडेशनला शुभेच्छा दिल्या.


भारतीय संघाने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर शाहिद आफ्रिदीला सर्व खेळाडूंच्या स्वाक्षरीसह विराट कोहलीची जर्सी गिफ्ट केली होती.