हर्ष गोयंका यांनी साधला विराट कोहलीवर निशाणा

पुणे आयपीएल संघाचे संघमालक आणि प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केला आहे. परंतु यावेळी त्यांचा निशाणा धोनी नसून भारतीय क्रिकेट बोर्ड आणि कोहली आहे.

आज सकाळी केलेल्या ट्विटमध्ये गोयंका यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाला कोणती काम दिली जातात यावर उपहासात्मक टीका केली आहे. त्यात गोयंका म्हणतात, ” भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज करताना लागणारी पात्रता: भारतीय संघाच्या दौऱ्याचा वेळापत्रक आखणे, हॉटेल रूम्स खेळाडूंसाठी आरक्षित करणे, बीसीसीआयच्या आदेशांचे पालन करणे आणि भारतीय कर्णधारचे म्हणणे ऐकणे. ”

गोयंका यांनी एकप्रकारे यातून विराट कोहलीच्या कुंबळेबद्दलच्या वागण्यावर जोरदार प्रहार केला आहे. तसेच बीसीसीआयवरही ताशेरे ओढले आहेत.

https://twitter.com/hvgoenka/status/879561190652780544?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fwest-indies-vs-india-2017%2Fafter-ms-dhoni-harsh-goenka-now-takes-on-virat-kohli-1717576

गेल्या आठवड्यात भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदावरून पायउतार होताना कुंबळे यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीला आपल्या कामाची शैली आवडत नसल्याचं बोललं होत.

भारतीय प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची तारीख सध्या वाढवून ९जुलै करण्यात आली आहे. गेल्या वेळी प्रशिक्षक पदाची संधी थोडक्यात हुकले रवी शास्त्री ह्यावेळी पुन्हा नव्याने अर्ज करणार आहे.