कानपुरच्या खेळपट्टीला छावणीचे स्वरूप

कानपुर | भारत विरुद्ध न्यूजीलँड संघांमध्ये होणाऱ्या ३ऱ्या वनडे सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या ग्रीनपार्क स्टेडियमच्या खेळपट्टीला उत्तरप्रदेश क्रिकेट बोर्डाने विशेष सुरक्षा दिली आहे. पुण्यात खेळट्टीवरून झालेल्या वादामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

उत्तरप्रदेश क्रिकेट बोर्डाचे सचिव युद्धवीर सिंग म्हणाले म्हणाले “पुणेच्या घटनेनंतर आम्ही जरा जास्त काळजी घेत आहे. पोलीस रक्षकांना सांगण्यात आले आहे की योग्य परवानगी किंवा पास शिवाय कोणालाही स्टेडियममध्ये सोडू नये. याआधीही आम्ही अशी सुरक्षा ठेवली होती पण सध्या जरा जास्त काळजी घेत आहे. त्याचबरोबर ग्राऊंड स्टाफलाही खेळपट्टीच्या स्वभावाविषयी कोणाशीही न बोलण्याची सूचना केली आहे.”

बीसीसीआयचे क्युरेटर तपोष चॅटर्जी या खेळपट्टीची पाहणी करणार आहे.

सध्या शिव कुमार जे ग्रीन पार्क स्टेडिअमच्या मैदानाला पाणी देण्याचे काम करत होते आणि त्यांना या मैदानाचे क्युरेटर बनण्याची इच्छा होती ते अनधिकृतपणे सध्या खेळपट्टी तयार करण्यात मदत करत आहेत.

परवा भारत विरुद्ध न्यूजीलँडमध्ये ३ सामन्यांच्या मालिकेतील ३रा आणि निर्णायक वनडे सामना कानपूरला ग्रीनपार्क स्टेडिअमवर रंगणार आहे. याआधीच्या २ सामन्यात न्यूजीलँडने पहिली तर भारतीय संघाने २री वनडे जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

नक्की काय झाले होते पुण्यात :
पुण्याच्या एमसीए स्टेडियमच्या खेळपट्टीचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर हे ‘खेळपट्टी कशी असेल’ हे ऑन कॅमेरा सांगताना दिसले होते तर काही लोक खेळपट्टीला इजा पोहचेल असे करताना दिसले होते.

या घटनेनंतर क्युरेटर पांडुरंग साळगावकरांवर निलंबनाची कारवाई झाली होती.