विराट कोहलीने त्या हॉटेलच्या विजीटींग बुकमध्ये नक्की काय लिहले?

विंडीज विरुद्ध शेवटचा आणि पाचवा वनडे सामना खेळण्यास केरळमधील तिरुअनंतपुरम येथे पोहचलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे स्वागत चाहत्यांनी खूप जोषात आणि पांरपरिक संगीतामध्ये केले.

या राज्याचे सौंदर्य बघून भारतीय कर्णधार विराट कोहली भारावून गेला. तो ज्या कोवालम रॅविस हॉटेलमध्ये थांबला होता तेथील विजीटर्स बुकमध्ये त्याने या सौंदर्याविषयी एक विशेष पत्र लिहले असून त्यात हॉटेल स्टाफचेही आभार मानले आहे.

यामध्ये विराटने ‘केरळ हे एक अप्रतिम राज्य असून या शहरात येऊन मला खूप उत्तम वाटत आहे. मी दुसऱ्यांनाही सांगेल तुम्ही या शहरात या कारण येथील ऊर्जा शरीराला एक वेगळेच वळन देऊन जाते’ असे लिहले आहे.

विराट या वनडे मालिकेत यशस्वी ठरला असून त्याने अनेक विक्रमही केले आहेत. यावेळी त्याने पहिल्या सलग तीन वनडे सामन्यात शतक करण्याचा पराक्रम केला आहे. तसेच त्याने वनडेमध्ये सर्वात जलद 10000 धावाही केल्या आहेत.

पाच वनडे सामन्याच्या मालिकेत यजमान भारत 2-1 असा आघाडीवर आहे. मुंबईत झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताने विंडीजवर 224 धावांनी मोठा विजय मिळवला. भारताने पहिल्या आणि चौथ्या वनडे सामन्यात विजय मिळवला. तर विंडीजने तिसरा सामना जिंकला होता. दुसरा वनडे सामना हा अनिर्णीत राहिला.

महत्त्वाच्या बातम्या:

2019च्या आयपीएलमध्ये शिखर धवन खेळणार या संघाकडून

भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा