सराव सोडून टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेत जंगल सफारी

जोहान्सबर्ग । भारतीय संघाने पहिल्या दोन कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जाऊनही त्यातून काही धडा घेतल्याचे सध्यातरी दिसत नाही. खेळाडूंनी गेले तीन दिवस सोशल मीडियावर जे काही फोटो शेअर केले आहे यावरून ह्या गोष्टीचा चटकन अंदाज येतो.

भारतीय संघातील बहुतेक खेळाडू शुक्रवारी सराव सोडून फिरायला गेले होते. यात उमेश यादव, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहमंद शमी या खेळाडूंचा समावेश आहे.

कर्णधार कोहली मालिकेत झालेल्या पराभवामुळे मोठ्या प्रमाणावर नाराज असून शेवटचा सामना जिंकण्यासाठी तो जोरदार प्रयत्न करणार आहे. असे असले तरी आधी केलेल्या चुकांमधून काही शिकून पुन्हा त्या चुका टाळण्यासाठी सराव गरजेचा असताना संघ त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

भारतीय खेळाडूंना वेगवान गोलंदाजांचा चांगला सामना करता यावा म्हणून भारतातून दोन गोलंदाज बोलावून घेण्यात आले आहे. हे दोन गोलंदाज उद्या आणि आणि परवा संघासोबत सराव करणार आहे. असे असताना संघातील खेळाडू काही माध्यमातील रिपोर्ट्सनुसार रविवारी सराव करणार नसल्याचे बोलले जात आहे.

भारतीय संघ येथे सोमवारी सराव करेल असे बोलले जात आहे.

 

 

View this post on Instagram

Enjoyyyyyy

A post shared by Mohammad Shami (@mdshami.11) on