सलमान खानच्या वाढदिवसाला कॅप्टन कूलची हजेरी

मुंबई । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक एमएस धोनीने काल सलमान खानच्या  वाढदिवसाला हजेरी लावली होती. सलमान खान आज आपला ५२वा वाढदिवस साजरा करत आहे. 

काल विराट अनुष्काच्या मुंबई येथे झालेल्या स्वागत समारंभाला हजेरी लावल्यावर पत्नी साक्षी सिंग धोनीबरोबर कॅप्टन कूल पनवेलमधील सलमानच्या रिसॉर्टकडे रवाना झाला. 

विरुष्काच्या स्वागत सोहळ्याला एमएस धोनी, पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा आलेले फोटो व्हायरल झाले होते. काल मुंबई आणि संपूर्ण भारतात या कार्यक्रमाची चर्चा होती. 

भारतीय संघातील अन्य खेळाडूंमध्ये केदार जाधवसुद्धा सलमान खानच्या वाढदिवसाला उपस्थित असल्याची चर्चा होती. यापूर्वीही केदारने सलमान बरॊबरचा फोटो शेअर केला होता. 

हे दोन्ही खेळाडू भारतीय कसोटी संघात खेळत नसल्यामुळे त्यांनी सलमानच्या वाढदिवसाला हजेरी लावली कारण अन्य कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंना उद्या सकाळी दक्षिण आफ्रिकेकडॆ मुंबईमधून रवाना व्हायचे आहे.