कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयकडून मोठा धक्का

भारतीय संघाच्या परदेश दौऱ्यात पत्नीला सोबत राहू देण्याची विनंती कर्णधार विराट कोहलीने केली होती. त्यावर प्रशासकीय समितीने महत्वपुर्ण निर्णय दिला आहे.

प्रशासकीय समिती, संघ व्यवस्थापन आणि संघातील खेळाडू यांच्यात झालेल्या चर्चेनंतर यावर निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासकीय समितीने  सध्या क्रिकेट आॅस्ट्रेलिया वापरत असलेल्या नियम वापरण्याचा विचार केला आहे.

क्रिकेट आॅस्ट्रेलिया आणि तेथील क्रिकेटपटूंची संघटना हे दोन्ही प्रत्येक दौऱ्याआधी किती वेळ क्रिकेटपटूंनी परदेश दौऱ्यात किती वेळ आपल्या कुटुंबासाठी द्यायचा हे ठरवतात. त्यालाच ‘फॅमिली पिरियड’ म्हणतात. हा कालावधी वेगवेगळ्या दौऱ्यासाठी वेगवेगळा असतो.

2019 च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत बीसीसीआय आपला निर्णय बदलण्याच्या विचारात नाही.आॅस्ट्रेलिया आणि न्युझिलंड येथे झालेल्या विश्वचषक 2015 मधील निर्णय कायम ठेवणार आहे. विश्वचषक स्पर्धेत सेमी फाइनल पर्यंत कुटुंबाला सोबत ठेवण्याची परवानगी नाही.

“कुटुंब सोबत ठेवण्याचा निर्णय हा प्रत्येक खेळाडूचा वेगवेगळा असू शकतो.” असे परदेश दौऱ्यात कुटुंबसोबत ठेवण्याच्या मुद्यावर बोलताना गौतम गंभीर म्हणाला होता.

महत्वाच्या बातम्या-