चेन्नई एक्सप्रेस एमएस धोनीचे ०.१६ सेकंदातील हे अफलातून स्टंपिंग पहाच!

पुणे | आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राॅयल चॅलेंजर बेंगलोर सामन्यात बेंगलोरने २० षटकांत ९ विकेट गमावत  १२७ धावा केल्या आहेत.

एवढी चांगली फलंदाजी असलेल्या या संघाला चेन्नई समोर फलंदाजी करणे कठीण होऊन बसले आहे. यात चेन्नईकडून अफलातून गोलंदाजी केली ती अष्टपैलू खेळाडू रविद्र जडेजाने.

त्याने या सामन्यात ३ विकेट्स घेतल्या. त्याला तेवढीच उत्तम साथ दिली ती हरभजन सिंगने. भज्जीने या सामन्यात ४ षटकांत २२ धावा देत २ विकेट्स घेतल्या.

त्याला पहिला विकेट ही दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज आणि राॅयल चॅलेंजर बेंगलोरचा एबी डी विलियर्सची मिळाली.

एबी भज्जीला रिवर्स स्विपचा फटका मारण्यासाठी जेव्हा पुढे आला तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने त्याला स्टंपिंग केले होते. विशेष म्हणजे धोनीने हे स्टंपिंग केवळ ०.१६ सेकंदात केले.

बऱ्याच दिवसांनी धोनीची अफलातून स्टंपिंग पाहुन चाहत्यांनी यावेळी एकच जल्लोश केला.