२०१९ क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाच असणार सर्वात वयस्कर संघ

मुंबई | इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकात भारताचा बाकी संघांपेक्षा वयस्कर संघ उतरणार आहे. २०१५मध्ये भारतीय संघाचे सरासरी वय २७.४१ होते. यावेळी खेळाडूंचे सरासरी वय त्यापेक्षा जास्त असणार आहे.

सध्याच्या भारतीय संघात एमएस धोनी, दिनेश कार्तिक, रोहित शर्मा, अंबाती रायडू, शिखर धवन आणि केदार जाधव हे तिशी पार केलेले खेळाडू आहेत. तर कर्णधार कोहलीसह काही खेळाडू विश्वचषकापुर्वी तिशी पार करणार आहे.

एशिया कपमध्ये खेळलेल्या संघाचे सरासरी वय २८.६८ होते तर हाॅंगकाॅंगच्या संघाचे सरासरी वय २३.१८ होते.

सध्या वन-डे खेळत असलेल्या संघ हा वयाची सरासरी जास्त असलेला संघ आहे. तर दुसऱ्या स्थानावर न्युझीलंड संघ असुन त्यांच्या संघातील खेळाडूंचे सरासरी वय २८.३० तर इंग्लंडच्या संघातील खेळाडूंचे सरासरी वय २८.२८ आहे.

२०१५ क्रिकेट विश्वचषकात केवळ स्टुअर्ट बिन्नी आणि एमएस धोनी हेच ३० पेक्षा जास्त वय असलेले खेळाडू होते.

सध्या खेळत असलेल्या संघातील अनेक खेळाडूंना २०१९ विश्वचषकात संधी मिळणार आहे. त्यामुळे या सरासरी वयात वाढच होणार आहे.

सध्या वन-डे क्रमवारीत ज्या संघातील खेळाडूंच्या वयाची सरासरी जास्त आहे ते ३ संघ आहेत. त्यामुळे हे संघ याचा विश्वचषकात याचा करा फायदा करुन घेतात किंवा याचा संघाला तोटा होतो हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-