दिग्गज खेळाडूने एशियन गेम्सबद्दल केले मोठे भाष्य

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाने आशियायी स्पर्धेत सुवर्णपदकाचा विश्वास व्यक्त केला आहे. भारताला या स्पर्धेत नक्की सुवर्णपदक मिळेल असे मत या दिग्गज खेळाडूने व्यक्त केले आहे.

दीपक हुड्डा गेल्या काही वर्षापासून भारतीय कबड्डी संघातील प्रमूख खेळाडू आहे.

दुबई येथे झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत कव्हर डिफेंडर म्हणून खेळला आहे. संघासाठी दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारा तो मोठा खेळाडू आहे.

तुमची भारतीय संघात जोपर्यंत निवड होत नाही तोपर्यंत तुम्ही थोडे तणावाखाली असता, असे दीपक यावेळी म्हणाला.

कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सराव शिबीरे घेतली जातात. संघात निवड होण्यासाठी एक प्रक्रिया असते, अनेक महिने शिबिरे चालतात. काहीवेळा, जरी आपल्याला निवड चाचणीमध्ये चांगले प्रदर्शन केल्याबद्दल खात्री असली तरीही जोपर्यंत जर्सी मिळवत नाही तोपर्यंत काहीही सांगु शकत नाही, असे दीपक म्हणाला.

पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेनंतर २०१४ ला आशियाई गेम्समध्ये भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले.

देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणार यापेक्षा खेळाडूंच्या आयुष्यातील मोठा क्षण असू शकत नाही. पहिल्यांदा भारतीय संघाची निळी जर्सी घालण्याचा क्षण मी विसरू शकत नाही, असेही दीपक पुढे म्हणाला.

या खेळाडूला प्रो कबड्डीत पाचव्या पर्वासाठी १.१५ कोटींची बोली लागली आहे.

कबड्डीमुळे आपले जीवन बदले आहे, आशियाई गेम्स मध्ये भारत पुरुष कबड्डीत आठवे सुवर्ण मिळवले, त्यासाठी तयारी सुरू आहे, असे हुड्डा म्हणाला.

खेळताना दबाव असतो पण आत्मविश्वास आहे. आम्ही कबड्डी मास्टर्स दुबईमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आमचा मनबोल उंचावले आहे. फिटनेसची पातळी पण वाढली आहे, खरे तर मी म्हणतो की खुप सुधारणा झाली आहे. आशियाई स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे, असेही तो पुढे म्हणाला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-स्म्रीती मानधनाच्या यशात कर्णधार विराट कोहलीचा मोठा वाटा

-ती एक पोस्ट आणि कामरान अकमलवर चाहते पडले तुटून