अखिल भारतीय मानांकन पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत सिवादीप कोसाराजू, सालसा आहेर यांचे सनसनाटी विजय

पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन पुरुष व महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात सिवादीप कोसाराजू, कुणाल वझिरानी यांनी तर महिला गटात सालसा आहेर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकीत तेलंगणाच्या सिवादीप कोसाराजू याने सहाव्या मानांकित ओरिसाच्या अंशु कुमार भुयानचा ६-२, २-६, ६-२असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.

महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित जयेश पुंगलियाने रोहन भाटियाचे आव्हान ६-४, ६-३असे संपुष्टात आणले. राजस्थानच्या फरदीन कुमारने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या अरमान भाटियाचा ६-३, ६-३असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. अव्वल मानांकित राजस्थानच्या फैजल कुमार याने चिन्मय प्रधानचा ६-३, ६-१असा सहज पराभव केला.

महिला गटात महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत सालसा आहेर हिने पाचव्या मानांकित साई दैदिप्याचा ६-३, ६-२असा सरळ सेटमध्ये पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित गोव्याच्या नताशा पल्हाने महाराष्ट्राच्या नेहा घारेला ६-२, ६-२असे पराभूत केले. अनुशा कोंडावेत्तीने प्रगती सोलणकरचा टायब्रेकमध्ये ६-३, ७-६(३)असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष गट: उप-उपांत्यपूर्व फेरी: फैजल कुमार(१)वि.वि.चिन्मय प्रधान ६-३, ६-१; फरदीन कुमार वि.वि.अरमान भाटिया ६-३, ६-३; जयेश पुंगलिया(४)वि.वि.रोहन भाटिया ६-४, ६-३; अनुराग नेनवानी(८)वि.वि.आलोक आराध्या ६-३, ६-१; सिवादीप कोसाराजू वि.वि.अंशु कुमार भुयान(६)६-२, २-६, ६-२;इशाक इकबाल(३)वि.वि.ऋषी रेड्डी ७-५, ५-७, ३-०सामना सोडून दिला; कुणाल वझिरानी वि.वि.विनोद श्रीधर(७) ६-३, ६-७(९)सामना सोडून दिला; परमवीर बाजवा(२)वि.वि.गुहान राजन ६-४, ६-३;

महिला गट: नताशा पल्हा(१)वि.वि.नेहा घारे ६-२, ६-२; अनुशा कोंडावेत्ती वि.वि.प्रगती सोलणकर ६-३, ७-६(३); नित्याराज बाबुराज(३)वि.वि.वैशाली ठाकूर ६-०, ६-१; सौम्या विज(७)वि.वि.ब्रिन्दा दयाल ६-०, ६-०; अविष्का गुप्ता(६) वि.वि.शाजीहा सईदा ६-०, ६-१; यूब्रानी बॅनर्जी(४)वि.वि.स्वरदा परब ६-२, ६-४; सालसा आहेर वि.वि.साई दैदिप्या(५)६-३, ६-२; हुमेरा शेख(२)वि.वि.प्रियांका रॉड्रिक्स ६-३, ६-१;

दुहेरी: पुरुष: पहिली फेरी: एस रवी शंकर/रित्विक आनंद वि.वि.उमेर शेख/क्रिस्टीन कमिन्स ६-४, ६-४; निकित रेड्डी/ऋषी रेड्डी वि.वि.जुनेद सुनेसरा/जावेद सुनेसरा ६-४, ६-२.