एमएसएलटीए योनेक्स सनराईज टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत सानिका भोगाडे, आदिती लाखे, सिद्धार्थ मराठे यांचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात सिद्धार्थ मराठे याने, तर मुलींच्या गटात सानिका भोगाडे, आदिती लाखे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत 12वर्षाखालील मुलींच्या गटात बिगरमानांकीत नगरच्या सानिका भोगाडे हिने अव्वल मानांकित मुंबईच्या स्वरा काटकरचा टायब्रेकमध्ये 7-6(7-2), 7-5असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पाचव्या मानांकित आदिती लाखेने तिसऱ्या मानांकित आस्मि आडकरचा 6-3, 6-3असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले.

अंतिम फेरीत आदितीचा सामना सानिका भोगाडेशी होणार आहे. मुलांच्या गटात अव्वल मानांकित ऋषिकेश अय्यरने तिसऱ्या मानांकित केवल किरपेकरचा 4-6, 6-4, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव केला. दुसऱ्या मानांकित पुण्याच्या अर्णव पापरकरने वेदांत भसीनचा 6-3, 6-1असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

14 वर्षाखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित इरा शहाने तिसऱ्या मानांकित सोहा पाटीलचा 6-1, 6-1असा सहज पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. चौथ्या मानांकित रुमा गाईकैवारीने मान्या बारंगेचा 6-1, 6-4असा पराभव करून आगेकूच केली. मुलांच्या गटात सिद्धार्थ मराठे याने आठव्या मानांकित केवल किरपेकरचा 6-0, 6-0एकतर्फी पराभव केला. सहाव्या मानांकित अझमीर शेखने वीर प्रसादचा 6-3, 6-3असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: 14वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
इरा शहा(1)वि.वि.सोहा पाटील(3)6-1, 6-1; रुमा गाईकैवारी(4)वि.वि.मान्या बारंगे 6-1, 6-4;

14वर्षाखालील मुले: सिद्धार्थ मराठे वि.वि.केवल किरपेकर(8)6-0, 6-0; अझमीर शेख(6)वि.वि.वीर प्रसाद 6-3, 6-3;

12वर्षाखालील मुली:
सानिका भोगाडे वि.वि.स्वरा काटकर(1)7-6(7-2), 7-5; आदिती लाखे(5)वि.वि.आस्मि आडकर(3)6-3, 6-3;

12वर्षाखालील मुले: ऋषिकेश अय्यर(1)वि.वि.केवल किरपेकर(3)4-6, 6-4, 6-3; अर्णव पापरकर(2)वि.वि.वेदांत भसीन6-3, 6-1.

दुहेरी गट: उपांत्य फेरी: मुली: गौतमी खैरे/सोहा पाटील(1)वि.वि.प्राप्ती पाटील/सानिया मोरे3-6, 6-3, 10-6; रुमा गाईकैवारी/सानिका भोगाडे वि.वि.स्वरा काटकर/आदिती लाखे 6-1, 6-4;

मुले: सिद्धार्थ मराठे/आर्यन सुतार वि.वि.उमर सुमेर/अजमीर शेख (2) 6-7(1), 6-3, 10-7; कुशल चौधरी/अर्णव ओरगंती (1)वि.वि.जैष्णव शिंदे/वीर प्रसाद (3) 6-3, 6-7(9-7), 11-9.