दुसरी कसोटी: एडन मार्करमचे अर्धशतक पूर्ण; प्रथम सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या बिनबाद ७८ धावा

सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्करमने अर्धशतक केले आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाला योग्य ठरवत दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांनी सामन्याच्या प्रथम सत्रात एकही बळी पडू दिला नाही.

प्रथम सत्राचा खेळ संपला तेव्हा मार्करम ८९ चेंडूत नाबाद ५१ धावांवर खेळत आहे. त्याच्या जोडीला डीन एल्गार ७३ चेंडूत २६ धावांवर नाबाद आहे. या दोघांनी मिळून प्रथम सत्रात नाबाद ७८ धावांची सलामी भागीदारी रचली आहे.

मात्र भारताकडून या सत्रात एकाही गोलंदाजाला बळी घेण्यात यश आलेले नाही.