व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत एयर इंडियाची मक्तेदारी, तर महिलांच्या व्यावसायिक कबड्डीलाही प्राधान्य

-अनिल विठ्ठल भोईर (राज्य कबड्डी पंच)

दिवसेंदिवस कबड्डी खेळांची व्याप्ती वाढत आहे. कबड्डी स्पर्धाच प्रमाणही वाढलं आहे. ५ जानेवारीला प्रो कबड्डीचा सहावा हंगाम संपला. त्यानंतर महाराष्ट्रातील कबड्डी स्पर्धांना जोरदार सुरुवात झाली. कबड्डी खेळाला चांगल्याप्रकारे व्यावसायिक स्वरूप मिळताना दिसत आहे. स्थानिक पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांबरोबरच व्यावसायिक स्पर्धांना चांगल्याप्रकारे प्राध्यान्य मिळताना दिसत आहे. व्यावसायिक कबड्डी स्पर्धेमुळे खेळाडूंना रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे कबड्डीपटूंना आर्थिक पाठबळ मिळू लागले आहे.

दिड महिन्यांत झाल्या ५ व्यावसायिक स्पर्धा-
स्वराज्य प्रतिष्ठान, विक्रोळी आयोजित आमदार राऊत चषक ही २०१९ च्या मोसमातील पहिली व्यावसायिक कबड्डी स्पर्धा १० ते १४ जानेवारी दरम्यान पार पडली. यास्पर्धेत १६ पुरुष तर १३ महिला व्यावसायिक संघांनी भाग घेतला होता. पुरुष विभागात भारत पेट्रोलियम संघाने तर महिला विभागात पश्चिम रेल्वेने विजेतेपद पटकावत मोसमाची सुरुवात केली.

६६ व्या पुरुष गट राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्रात झाल्यामुळे काही दिवस राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या नाहीत. फेब्रुवारी महिन्यात ३ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या २० दिवसाच्या कालावधीत ४ राज्यस्तरीय व्यावसायिक स्पर्धा महाराष्ट्रात पार पडल्या. ३ ते ६ फेब्रुवारी कोल्हापूर, ७ ते १० फेब्रुवारी भातसई रोहा, १४ ते १७ फेब्रुवारी कामगार स्पर्धा मुंबई, १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान दादर, मुंबई येथे व्यावसायिक कबड्डी स्पर्धाच आयोजन करण्यात आले होते.

पुरुष विभागात एयर इंडियाची मक्तेदारी-
आतापर्यंत झालेल्या ५ पैकीं ४ स्पर्धेत एयर इंडिया संघाने भाग घेतला होता. चारही स्पर्धेत एयर इंडिया संघाने अंतिम फेरीत धडक मारली. त्यांपैकी ३ वेळा विजेतेपद पटाकवत राज्यस्तरीय व्यावसायिक स्पर्धेत वर्चस्व प्रस्थापित केले.

विक्रोळी येथे झालेल्या स्पर्धेत एयर इंडीयाला भारत पेट्रोलियम संघाकडून १ गुणांनी अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यांनंतर कोल्हापूर येथे महिंद्रा अँड महिंद्रा, भातसई येथे भारत पेट्रोलियम तर दादर येथे महिंद्रा अँड महिंद्रा संघाला अंतिम फेरीत पराभव करून मोसमातील तिसरे विजेतेपद पटाकवले. एयर इंडिया व्यतिरिक्त भारत पेट्रोलियम संघाने १ वेळा तर मुंबई बंदर व जेएसडब्लू यांनी कामगार स्पर्धेत अनुक्रमे शहरी व ग्रामीण भागात विजेतेपद पटकावले.

एयर इंडिया संघ,
Photo Courtesy: Dinesh Ghadigaonkar

व्यावसायिक महिला कबड्डीलाही प्राधान्य-
पुरुष व्यावसायिक कबड्डी बरोबरच महिला व्यावसायिक कबड्डी स्पर्धालाही प्राधान्य मिळत आहे. विक्रोळीत झालेल्या मोसमातील पहिल्या व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत १३ महिला व्यावसायिक संघांनी सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय महिला खेळाडूंबरोबरच राज्यस्तरीय महिला खेळाडूंना यास्पर्धेत खेळायची संधी मिळाली. यास्पर्धेत ठाणे महानगरपालिका संघाने पर्दापण केले. यास्पर्धेत पश्चिम रेल्वेने विजेतेपद पटाकवले होते.

यानंतर कामगार कल्याण, एल्फिन्स्टन येथे झालेल्या स्पर्धेत स्थानिक व व्यावसायिक महिला संघांनी भाग घेतला होता. विजेतेपदासह उपविजेतेपद आणि तिसऱ्या क्रमांक महिला व्यावसायिक संघांनी पटाकवले. तसेच २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ठाणे महापौर कबड्डी स्पर्धा महिला साठी व्यावसायिक असणार आहे.

सुशांत साहिल ठरला २० दिवसात दुसऱ्यांदा मालिकवीर-
मुंबई शहर व एयर इंडियाचा युवा चढाईपटू सुशांत साहिलने दादर येथे झालेल्या स्पर्धेत मोसमातील दुसरा मालिकाविरचा पुरस्कार पटकावला. शिवनेरी सेवा मंडळ, सुवर्णमोहस्तवी कबड्डी स्पर्धेत सुशांत साहिलला बाईक देऊन गौरविण्यात आले.

एयर इंडिया संघाकडून सुशांतने फेब्रुवारीमध्येच खेळायला सुरुवात केली. कोल्हापूर येथे झालेल्या व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत एयर इंडियाकडून पहिल्यांदाच खेळतांना मालिकवीरचा पुरस्कार मिळावला. सुशांत साहिल बरोबरच मुंबई शहर व भारत पेट्रोलियमचा खेळाडू अजिंक्य कापरेने या मोसमात विक्रोळी व भातसई दोन स्पर्धात मालिकवीर पुरस्कार मिळावला आहे.

Photo Courtesy: Dinesh Ghadigaonkar

खेळाडूंची दमछाक-
फेब्रुवारी महिन्यात २८ दिवसात महाराष्ट्र्रामध्ये ५ राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धाच आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे खेळाडूंची चांगलीच दमछाक होत आहे. सलगच्या स्पर्धांमुळे काही संघांनी काही स्पर्धांमध्ये विश्रांती घेणं पसंद केला. ३ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या २० दिवसाच्या कालावधीत तब्बल चार व्यावसायिक कबड्डी स्पर्धा पार पडल्या. त्यामुळे खेळाडूंना एक ठिकानावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाची धावपळ, ४-४ दिवस कबड्डी स्पर्धा यामुळे खेळाडूंना विश्रांतीच मिळाली नाही.

पुढील ८ दिवसात दोन व्यावसायिक कबड्डी स्पर्धा-
ठाणे महापौर राज्यस्तरीय पुरुष व महिला व्यावसायिक कबड्डी स्पर्धे २५ ते २८ फेब्रुवारी याकालावधीत पार पडणार आहे. पुरुष व्यावसायिक स्पर्धे बरोबरच महिलांसाठी ही व्यावसायिक असणार आहे. त्यानंतर लगेच १ ते ४ मार्च या कालावधीत मुंबई महापौर कबड्डी स्पर्धा पुरुष गटासाठी व्यावसायिक असणार आहे.

मागील दीड महिन्यात झालेली राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेची आकडेवारी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या बातम्या- 

ओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी

शिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.