एशियन गेम्स: सौरव घोसालने भारताला मिळवून दिले स्क्वॅशमधील तिसरे कांस्यपदक

18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला शनिवारी (25 आॅगस्ट) स्क्वॅशमधील तिसरे कांस्यपदक मिळाले आहे. हे पदक सौरव घोसालने मिळवून दिले आहे.

त्याला हाँगकाँगच्या औ चुन्ग मिन्गने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत 2-3 (12-10, 13-11, 6-11, 6-11, 6-11) अशा फरकाने पराभूत केले आहे. त्यामुळे सौरवला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

सौरवने या सामन्यात चांगली सुरुवात केली होती. त्याने पहिले दोन्ही सेट जिंकत वर्चस्व निर्माण केले होते. परंतू तिसऱ्या सेटमध्ये आघाडी घऊनही त्याला हा सेट गमवावा लागला. त्यानंतर मात्र सौरवला चौथ्या आणि पाचव्या सेटमध्येही पराभूत व्हावे लागले.

सौरवच्या आधी स्क्वॅशमध्ये महिला एकेरीत दीपिका पल्लीकल आणि जोस्ना चिनप्पा या दोघींनाही प्रत्येकी कांस्यपदक मिळाले आहे. त्यामुळे भारताला स्क्वॅशमध्ये तीन कांस्यपदके मिळाली आहेत.

याआधी सौरवला एशियन गेम्समध्ये संघाकडून खेळताना 2010 ला कांस्यपदक तर 2014 ला सुवर्णपदक मिळाले आहे. तर एकेरीत 2006 आणि 2010 ला कांस्यपदक आणि 2014 ला रौप्यपदक मिळाले होते.

त्याचबरोबर यावर्षी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र दुहेरीत त्याला रौप्यपदक मिळाले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

पंड्या ब्रदर्स खेळणार २०१९ विश्वचषकात?

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मुख्य प्रशिक्षकाला डच्चू

एशियन गेम्स: भारताला दिवसाच्या सुरुवातीलाच दोन कांस्यपदके