बॅडमिंटनपटू अजय जयरामचे मजेशीर ट्विट

भारताचा प्रतिभावान बॅडमिंटनपटू अजय जयरामने आज मजेशीर ट्विट केले आहेत.  त्याच्या या ट्विट्सला स्टार बॅडमिंटनपटूंनीही रिप्लाय दिल्याने हे ट्विट्स चांगलेच वायरल झाले आहेत.

कॅनेला या प्रसिद्ध असणाऱ्या यूट्यूबरने ट्विटरवरून आपल्या फॉलोवर्सला एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की ” मला माहित नसलेली अशी एखादी गोष्ट सांगा.”

तिच्या या ट्विटला उत्तर म्हणून अजयने सांगितले की ” बॅडमिंटनच्या रॅकेटचे वजन त्याच्या ग्रीपशिवाय ७०-९५ ग्राम इतकेच असते.”

या त्याच्या ट्विटवर भारताचा स्टार बॅडमिंटनपटू पी कश्यपने आणि डॅनिश बॅडमिंटनपटू एच के विट्टीनघूसने रिप्लाय देऊन दाद दिली आहे.

याबरोबरच अजयच्या चाहत्यांनीदेखील त्याला रिप्लाय दिले आहेत.

अजयने दुखापतीमुळे मागील महिन्यात पार पडलेल्या चायना ओपन सुपर सिरीज आणि हाँग काँग ओपन सुपर सिरीज मधून माघार घेतली होती. सध्या तो जागतिक क्रमवारीत ३९ व्या स्थानी आहे.

तसेच अजय या महिन्यात २३ तारखेपासून सुरु होणाऱ्या प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये नॉर्थ ईस्टर्न वॉररियर्सकडून खेळणार आहे.