अजय ठाकूरची अक्षम्य अशी चूक तमिल थलाईवाजला पडली चांगलीच महागात

मंगळवारी (25 डिसेंबर) प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमातील 127 वा सामना हरियाणा स्टिलर्स विरुद्ध तमिळ थलायवाज यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात 40-40 अशी बरोबरी झाली आहे.

हा सामना तमिळने जवळजवळ जिंकला होता. पण त्यांचा कर्णधार अजय ठाकूरने मोठी चूक करत विजयाची संधी दवडली आहे.

झाले असे की हा सामना संपण्यासाठी शेवटचे 38 सेकंद बाकी असताना अजयने रेड केली तेव्हा तमिळ 40-38 असे आघाडीवर होते. त्यावेळी ही आघाडी कायम ठेवण्यासाठी अजयने धोका न पत्करता फक्त बॉक लाईनच्या जवळ उभा राहिला.

पण याचवेळी त्याची रेड संपण्यासाठी 10 सेकंद बाकी असताना हरियाणाच्या सुनीलने त्याचे लक्ष नसताना त्याला उचलून टॅकल केले. त्यावेळी अचानक काय झाले हे अजयच्या लक्षात आले नाही.

पण बाद झाल्याचे नंतर लक्षात आल्याने अजय तसाच डोक्याला हात लावून मॅटवर बसून राहिला होता. अजयची ही चूक तमिळसाठी चांगलीच महागात पडली. त्यानंतर त्यांना बरोबरीत समाधान मानावे लागले.

या सामन्यानंतर अजयनेही त्याची चूक मान्य केली आहे त्याने याबद्दलची पोस्ट इंस्टाग्रामला शेअर केली आहे. तसेच म्हटले आहे की ‘माझ्या आयुष्यातील ही दुसरी सर्वात मोठी चूक आहे पण असे होत असते, यातून चांगले शिकण्यास मिळाले.’

त्याच्या या पोस्टवर नुकताच कबड्डीमधून निवृत्त झालेला कॅप्टन कूल अनुप कुमारने कमेंट करताना म्हटले की ‘हे काय केले आहेस तू?’ त्यावर अजयने त्याची माफी मागितली आहे.

Screengrab: Instagram/ajaythakurkabaddi

महत्त्वाच्या बातम्या:

मयांक अगरवाल काही ऐकेना! केएल राहुलही आला टेन्शनमध्ये

कोहलीच्या विराट खेळीने लक्ष्मणचा व्हेरी व्हेरी स्पेशल विक्रम मोडीत

रिकी पाॅटिंगच्या देशात त्याच्या आवडत्या मैदानावरच विराट मोडला पाॅटिंगचा विक्रम