अजिंक्य रहाणेने दिलेला शब्द पाळला !

"स्वछता ही सेवा हे" कार्यक्रमात घेतला भाग !

भारताचा सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आमंत्रण स्वीकारून “स्वछता ही सेवा हैं” या कार्यक्रमात भाग घेतला आहे. या कार्यक्रमात भाग घेऊन त्याने रस्त्यांची सफाई केली आणि त्याचा एक फोटो ही आपल्या ट्विटर अकॉउंटवरून शेयर केला आहे.

काल भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणाऱ्या महात्मा गांधींची जयंती होती. त्या दिवशी भारतात स्वच्छ भारत दिवस साजरा केला जातो. गांधी जयंतीच्या निमित्ताने या वर्षी स्वछता ही सेवा हे या कार्यक्रमात मोदींनी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्टीत व्यक्तींना यासाठी आमंत्रित केले होते. त्यातील अजिंक्य रहाणे हा एक.

या बद्दल अजिंक्यने ट्विटरवर मोदींनी पाठवलेल्या पत्राचा फोटो ही शेयर केला होता आणि वचन दिले होते की तो या कार्यक्रमात भाग घेईल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिका रविवार ७ तारखेपासून चालू होणार आहे. पहिला सामना रांचीच्या मैदानावर खेळला जाणार आहे. वनडे मालिकेत चांगली कामगिरीकरूनही अजिंक्यला टी-२० संघात स्थान देण्यात आलेले नाही. अजिंक्यने या मालिकेत सलग चार अर्धशतके केली आहेत. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या पाचमध्ये आहे.

आतापर्यंत खेळलेल्या २० टी-२० सामन्यात त्याने २०च्या सरासरीने ३३१ धावा केल्या आहेत.