म्हणून अजिंक्य रहाणेने मानले चाहत्यांचे आभार !

अजिंक्य राहणे सध्या जरी क्रिकेटच्या मैदानावर दिसत नसला तरी त्याला एक चांगली बातमी मिळाली आहे. ट्विटर या सोशल मीडिया वेबसाईटवर त्याचे ३ मिलियन फॉलोवर्स झाले आहेत.

याबद्दल त्याने स्वतः ट्विट करत ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्याने ट्विटमध्ये आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. तो त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो “तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद ”

सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्यानंतर रहाणे हा तिसरा महाराष्ट्रीयन खेळाडू आहे ज्याचे ट्विटरवर ३ मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

रोहित शर्माचे ट्विटरवर ८ मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे ट्विटरवर २० मिलियन फॉलोवर्स आहेत. अन्य महाराष्ट्रीयन खेळाडूंमध्ये उमेश यादवचे १.३ मिलियन आणि केदार जाधव ५८ हजार फॉलोवर्स आहेत.

त्याची ऑस्ट्रेलियाबरोबर चालू असलेल्या टी २० मालिकेत निवड झाली नाही. त्यामुळे सध्या रहाणे पत्नी राधिका बरोबर परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलिया बरोबरच्या वनडे मालिकेत ४ अर्धशतके केली होती.