आयपीएल २०१८: अजिंक्य रहाणेसाठी भूवी ठरतोय धोकादायक

हैद्राबाद | आयपीएलच्या ११ व्या मोसमात आज चौथा सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. सनरायझर्स हैद्राबादचा राजस्थानविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय किती योग्य आहे हे सनरायझर्स हैद्राबादने जबरदस्त गोलंदाजी करत दाखवून दिले. २० षटकांत केवळ १२९ धावा देत सनरायझर्स हैद्राबादने या सामन्यात जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही याची काळजी घेतली आहे. 

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला १३ चेंडूत १३ धावा करत तंबूत परतावे लागले. त्याला सनरायझर्स हैद्राबादच्या सिद्धार्थ कौलने बाद केले. 

असे असले तरी आयपीएलमध्ये भूवनेश्वर कुमारने अजिंक्य रहाणेला तब्बल ६ वेळा बाद केले आहे. अजिंक्य रहाणेला भूवनेश्वर कुमार सोडून कोणत्याही गोलंदाजाने एवढ्या वेळा बाद केले नाही.