दोन मुंबईकर स्टार करणार भारतीय क्रिकेट संघाच नेतृत्व

मुंबई | अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी मालिका तसेच आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या टी२० सामन्यांसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. त्यात कसोटी संघाची धुरा मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर तर टी२० संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या अजिंक्य रहाणे हा कसोटी संघाचा उपकर्णधार आहे तर रोहितकडे मर्यादित षटकांच्या प्रकारात संघाचे उपकर्णधारपद आहे.  कर्णधार विराट कोहली हा या अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी मालिकेसाठी तसेच आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या दोन टी२० सामन्यांसाठी उपलब्ध नसणार आहे. तो तेव्हा सरेकडून काऊंटी क्रिकेट खेळत असणार आहे.

Read- हा आहे आयपीएल २०१८मधील एक सर्वोत्तम कॅच

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना १४ ते १८ जूनला बेंगलोर येथे तर आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या दोन टी२० सामन्यांतील पहिला २७ जून तर दुसरा सामना २९ जून रोजी होणार आहे.

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात ५ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी २० सामने होणार असून ३ जुलै पासून टी २० मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. यासाठी मात्र संघ निवड आता होणार नाही.

कर्णधार नात्याने अजिंक्य रहाणेची कामगिरी- 

वनडे- सामने-३  विजय-३   पराभव-०

कसोटी- सामने-१  विजय-१   पराभव-०

टी२०- सामने-२  विजय-१   पराभव-१

कर्णधार नात्याने रोहित शर्माची कामगिरी- 

वनडे- सामने-३  विजय-२  पराभव-१

कसोटी- सामने-०  विजय-०   पराभव-०

टी२०- सामने-९  विजय-८   पराभव-१

या मालिकांसाठी होणार आज संघ निवड-

अफगाणिस्तानविरुद्धची १ कसोटी
इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघ
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज अ विरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी भारत अ संघ
आयर्लंडविरुद्ध टी२० संघ
इंग्लंड दौऱ्यासाठी टी२० संघ
इंग्लंडविरुद्ध वन डे संघ

Read- १० पैकी ८ मॅच जिंकणारी हैद्राबादही होऊ शकते आयपीएलमधून बाहेर