अजिंक्य रहाणेचे मुंबई संघात आगमन !

भुवनेश्वर । भारतीय संघाचा सदस्य आणि सध्या टी२० संघाबाहेर असलेल्या अजिंक्य रहाणे आज मुंबई संघासोबत भुवनेश्वरला मार्गस्थ झाला.

भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धची टी२० मालिका उद्यापासून फिरोजशाह कोटला दिल्ली येथील सामन्याने सुरु होत आहे. तर मुंबई रणजी संघ देखील ओडिसा संघाशी दोन हात करण्यासाठी आज भुवनेश्वर येथे रवाना झाला.

या संघाबरोबर अजिंक्य रहाणेनेही आहे. त्याने वनडे मालिका संपण्यापूर्वीच आपण रणजी स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचे कळवले होते.

याच संघातील श्रेयस अय्यरची मात्र भारतीय टी२० संघात निवड झाल्यामुळे तो मुंबई संघाबरोबर नसेल.

रहाणेने याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

मुंबई विरुद्ध ओडिसा हा सामना उद्यापासून येथील केआयआयटी स्टेडियम, भुवनेश्वर येथे खेळवला जाणार आहे.