टीम इंडिया तिसरी कसोटी जिंकणारच, रहाणेने शोधली आहे नवीकोरी आयडीया

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात होणारा तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ एक-एक सामने जिंकत बरोबरीत आहेत.

या दोन्ही सामन्यात भारतीय सलामी फलंदाजांनी चांगलीच निराशा केली. तर गोलंदाजांची कामगिरी उत्कृष्ठ झाली आहे.

यामुळे आता भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने यावर खास उपाय सुचवला आहे. फलंदाजांनी गोलंदाजांना योग्य मदत केली तर आपण सहज सामना जिंकू शकतो असे विधान त्याने केले आहे.

कसोटीमध्ये अव्वल असणाऱ्या भारतीय संघाने यावर्षी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात कसोटी सामने गमावले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीरांची ढिसाळ कामगिरी सुरू असल्याने पूर्ण दबाव मधल्याफळीवर येत आहे.

“विदेशात आमचे गोलंदाज 20 विकेट्स घेण्यास तयार आहेत. पण सामने जिंकायचे असतील तर फलंदाजांना उत्तम कामगिरी करण्याची गरज आहे”, असे रहाणे म्हणाला.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन सामन्यात रहाणेने 164 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याने आतापर्यत 54 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये रहाणेने 41.39च्या सरासरीने 3435 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 9 शतके आणि 17 अर्धशतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

२० वर्षापूर्वी केलेल्या मास्टर ब्लास्टरच्या त्या विक्रमाला विराट कोहली देणार धक्का ?

या ५ कारणांमुळे रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत येणार ओपनिंगला

आयपीएलच्या १२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी गोष्ट होणार

एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात मोठी खुशखबर