अजिंक्य रहाणेने शेयर केला आजीबरोबरचा खास फोटो

भारतीय संघाचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने आज त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आजीबरोबरच फोटो शेयर केला आहे.

त्याने या फोटोला “आजीच्या प्रेमासारखे दुसरे प्रेम नाही” असे कॅप्शन दिले आहे. रहाणे मूळचा संगमनेर तालुक्यातील गावातला आहे. पण लहानपणापासूनच रहाणे आपल्या कुटुंबाबरोबर डोंबिवली येथे राहतो.

View this post on Instagram

Grandma’s love feels like nobody else’s ❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

त्याने क्रिकेट कारकिर्दीच्या सुरवातीला मुंबईचे फलंदाज प्रवीण आम्रे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले असून २०११ मध्ये भारतीय संघातून आंतराष्ट्रीय पदार्पण केले आहे. त्याने आत्तापर्यंत ४४ कसोटी सामन्यात २८८३ धावा, ९० वनडे सामन्यात २९६२ धावा आणि २० टी २० सामन्यात खेळताना ३७५ धावा केल्या आहेत.

सध्या तो भारताच्या टी २० संघात नसल्याने दक्षिण आफ्रिकेतून मुंबईला परतला आहे. त्याच्यासाठी दक्षिण आफ्रिका दौरा म्हणावा तेवढा यशस्वी ठरला नाही. त्याला पहिल्या दोन कसोटीसाठी ११ जणांच्या संघात स्थानच मिळाले नव्हते. पण त्याने तिसऱ्या कसोटीत संधीचा फायदा घेताना संयमी खेळी केली होती.

त्यानंतर त्याला वनडेत संधी मिळाली होती, पण त्यात त्याला विशेष काही करता आले नाही. आता पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या टी २० तिरंगी मालिकेसाठी विराट कोहलीला जर विश्रांती दिली तर रहाणेला भारतीय संघात स्थान मिळते की नाही हे पाहावे लागेल.