म्हणून अजिंक्य रहाणेला मिळाले नाही वनडे संघात स्थान !

 भारतीय संघाला काल झालेल्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाविरुद्ध लाजीवरवण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर कर्णधार रोहित शर्माला जोरदार टीकेला तोंड द्यावे लागले.

अजिंक्य रहाणेला संघात स्थान देण्यात न आल्यामुळे क्रिकेटप्रेमी तसेच क्रिकेट पंडितांच्या टीकेला सामोरे जावे लागले.

या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंमध्ये अनुभवाची कमी दिसून आली.सामना झाल्यावर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने अजिंक्य रहाणेला संधी देण्याबद्दल भाष्य केले. तसेच त्याला संघात संधी द्यायला हवी असेही म्हटले.

तरीही का दिली नाही रहाणेला संधी?
तरीही रहाणेला संघात संधी का दिली नाही याबद्दल बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ” श्रेयस अय्यरला संघात याचमुळे स्थान देण्यात आले कारण अजिंक्य रहाणेला संघात एक सलामीवीर म्हणून स्थान देण्यात आले आहे. संघात पूर्णवेळ सलामीवीर असल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले नाही.”

“श्रीलंका दौऱ्यात हे सिद्ध झाले आहे की अजिंक्य रहाणे हा पूर्णवेळ सलामीवीर आहे. आम्हाला त्याची खेळण्याची जागा बदलायची नाही. खेळाडूंची जर सतत खेळायची जागा बदलली तर त्यांच्या मनात वेगळे विचार येतात. “असेही रोहित पुढे म्हणाला.