अजिंक्य रहाणेने अशा दिल्या विराट-अनुष्काला शुभेच्छा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काल इटली देशात लग्नबंधनात अडकले. यावेळी काही जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते.

यानंतर विराट अनुष्काला विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. भारतीय संघाचे पारंपरीक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघातीलही अनेक क्रिकेटपटुंनी नवविवाहित दांपत्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

परंतु खास शुभेच्छा दिल्या त्या दोन मुंबईकर खेळाडूंनी. एक रोहित शर्मा तर दुसऱ्या अजिंक्य रहाणेने.

अजिंक्य रहाणेने ट्विट करत शुभेच्छा दिल्या. रहाणे आपल्या शुभेच्छांमध्ये म्हणतो, ” अभिनंदन विराट आणि अनुष्का. तुम्हाला वैवाहिक जीवन आणि या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा. लग्न झालेल्या खेळाडूंच्या क्लबमध्ये तुझे स्वागत कर्णधार. “

भारतीय संघातील आता बहुतेक खेळाडूंचे लग्न झाले आहे. दिल्ली कसोटीत जो भारतीय संघ खेळला त्यातील आता ११ पैकी ११ खेळाडूंचे लग्न झाले आहे.