- Advertisement -

अजिंक्य रहाणे म्हणतोय विश्वचषकात चांगले खेळा !

0 496

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर अजिंक्य रहाणेने भारतात होणाऱ्या फिफा विश्वचषक अंडर-१७ साठी भारतीय फुटबॉल संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. फिफा विश्वचषक अंडर १७ चा पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

अजिंक्य रहाणेने ट्विटरवर यासाठी एक खास विडिओ शेअर केला आहे. “माझ्याकडून भारतीय अंडर १७ फुटबॉल संघाला शुभेच्छा आणि प्रेम! मला खात्री आहे की आपण चांगली कामगिरी कराल. आम्ही आपणाला पाठिंबा देत आहोत. मस्त खेळा आणि आनंद घ्या. चिअर्स.” असे रहाणे आपल्या संदेशात म्हणतो.

अजिंक्य रहाणेने ह्याच आठवड्यात संपलेल्या ५ सामन्यात ४ डावात ४८.८०च्या सरासरीने २४४धावा केल्या. तरीही त्याला ३ सामन्यांच्या टी२० संघात स्थान देण्यात आलेले नाही.

Comments
Loading...
%d bloggers like this: