आगामी वन-डे मालिकेत धोनीला वगळा आणि पंतला संधी द्या!

मुंबई । भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागील काही दिवसांपासून आपल्या खराब फाॅर्ममुळे संघर्ष करताना दिसत आहे. त्यामुळे 2019 विश्वचषक स्पर्धेत धोनीला असणाऱ्या पर्यायाची चर्चा होताना दिसते.

विंडिजविरूद्धच्या कसोटीत रिषभ पंत शतकाच्या जवळ पोहचला होता. त्याने इंग्लंडविरूद्धच्या अखेरच्या कसोटीत शानदार शतक ठोकले होते. रिषभ पंतला विंडिजविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी दिली पाहिजे,असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने व्यक्त केले आहे.

”रिषभ पंत हा वन-डे संघाचा सदस्य नाही यावर माझा विश्वास बसत नाही. त्याला संघात संधी दिली गेली पाहिजे. धोनीला विंडिजविरूद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेत विश्रांती दिल्याने जास्त नुकसान होणार नाही”. असे आगरकरने सांगितले.

भारतीय संघात वरच्या फळीत जागा मिळवण्यासाठी खुप स्पर्धा आहे. त्यामुळे रिषभ हा सहाव्या क्रमांकावर योग्य असल्याचे मत देखील आगरकरने व्यक्त केले आहे.

रिषभ हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात चांगला खेळतो. त्याला पहिल्या 6 फलंदाज जागा देण्यात काहीही शंका नाही. भारतीय संघात मधल्या फळीतील डावखुऱ्या फलंदाजाची कमी तो भरून काढू शकतो, असेही आगरकर पुढे म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-