सईद अजमलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय-बाय

लाहोर । पाकिस्तानचा ऑफ स्पिनर सईद अजमलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय म्हटले आहे. त्याने याबरोबर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून थांबण्याचा निर्णय घेतला आहे. 

“मी राष्ट्रीय टी२० स्पर्धेनंतर कोणतेही क्रिकेट खेळणार नाही. माझी क्रिकेट कारकीर्द मोठ्या प्रमाणावर चांगली राहिली. मी जी ध्येय ठेवली होती ती पूर्ण झाली. मी संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी झालो याचा मला अभिमान आहे. ” असे तो म्हणाला. 

सईद अजमल एप्रिल २०१५ रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तो एकवेळचा जागतिक वनडे आणि टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला खेळाडू होता. त्याने क्रिकेटचे तिन्ही प्रकार आपल्या खास गोलंदाजीने गाजवले. 

२०१२ मध्ये त्याने ३ कसोटी सामन्यात चक्क २४ विकेट्स घेतल्या होत्या. 

अजमलने कसोटीत ३५ सामन्यात १७८, वनडेत ११३ सामन्यात १८४ तर टी२०मध्ये ६४ सामन्यात ८५ विकेट्स घेतल्या आहेत. 

सईद अजमलची कारकीर्द ही त्याच्या चांगल्या कामगिरीबरोबर वादग्रस्त गोलंदाजी शैलीमुळेही तेवढीच गाजली. त्यामुळे त्याला बंदीचा सामना करावा लागला.