या १५ वर्षाच्या गोलंदाजाने एकही धाव न देता घेतले १० बळी

0 350

राजस्थानच्या आकाश चौधरी नावाच्या १५ वर्षांच्या मुलाने आज एका घरेलू टी २० सामन्यात एकही धाव न देता १० बळी घेतले. त्याने ही कामगिरी कै. भवर सिंग टी २० टूर्नामेंटमध्ये दिशा क्रिकेट अकॅडमीकडून खेळताना केली. त्यांचा सामना पर्ल क्रिकेट अकॅडमी विरुद्ध झाला.

ही स्पर्धा राजस्थान मधील एका मैदानाच्या मालकाने त्याच्या आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केली होती.

या सामन्यात पर्ल अकॅडमीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिशा क्रिकेट अकॅडमीला २० षटकात १५६ डावात रोखले. याला प्रतिउत्तर देताना पर्ल अकॅडमीचे फलंदाज अवघ्या ३६ धावांत सर्वबाद झाले.

पर्लच्या सर्व फलंदाजांना एकट्या आकाशने सर्वबाद केले. त्याने त्याच्या चार षटकांमध्ये पहिल्या तीनही षटकात प्रत्येकी २ बळी घेतले आणि चौथ्या आणि त्याच्या अखेरच्या षटकात ४ बळी घेऊन सर्वांचे लक्ष वेधले.

Comments
Loading...
%d bloggers like this: