आकाश गणेशवाडे, रितिका जालानी यांची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड

पुणे। आंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने भारतीय रोलबॉल संघटना आणि कर्नाटक रोलबॉल संघटनेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान तिसऱ्या ‘आशियाई रोलबॉल स्पर्धेचे’ आयोजन शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब, बेळगाव (कर्नाटक) येथे करण्यात आले असून या स्पर्धेत १६ देश सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत आकाश गणेशवाडे (महाराष्ट्र) व रितिका जालानी (राजस्थान) हे भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविणार आहेत, अशी माहिती भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष विनीत कुबेर व सचिव राजू दाभाडे यांनी दिली.

ही स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन्ही गटात रंगणार असून या स्पर्धेत भारतासह ओमान, सौदी अरेबिया, येमेन, बांग्लादेश, भूतान, म्यानमार, कंबोडिया, श्रीलंका, नेपाळ, हॉंगकॉंग, मालदीव, संयुक्त अरब अमिराती (युएई), इंडोनेशिया, थायलंड आणि मलेशिया या देशातील सुमारे ४०० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन २१ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांच्या हस्ते होणार आहे.

या स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. पुरुष गटात आकाश गणेशवाडे, तर महिला गटात रितिका जालानी यांची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे यांनी जाहीर केलेला भारतीय संघ पुढील प्रमाणे :

पुरुष : आकाश गणेशवाडे (कर्णधार, महाराष्ट्र ), शुभम चव्हाण, शंकर राऊत (महाराष्ट्र), भानू खजुरिया (जम्मू-काश्मीर), विजय बारला (राजस्थान), चेतन डोंडा (गुजरात), त्रिभुवन पटेल (उत्तर प्रदेश), चमन जैन (छत्तीसगड), मनदीप सिंग (पंजाब), निखिल चिंडक (कर्नाटक), पवन कुमार (दिल्ली) आणि मोनू गुप्ता (झारखंड) प्रशिक्षक : मधू शर्मा (जम्मू-काश्मीर) , व्यवस्थापक : सूर्यदत्त जोशी (मध्य प्रदेश).

महिला : रितिका जालानी (कर्णधार, राजस्थान), श्वेता कदम (महाराष्ट्र), अंकिता चोपडा, सुविधा सरीन , रुही राजपूत (जम्मू-काश्मीर), मनीषा प्रधान (आसाम), सृष्टी वर्मा (छत्तीसगड), सावलिया मानसी, पूर्वी उरवाहा, भकर जान्हवी (गुजरात), महिमाश्री सी. एम (तमिळनाडु), आणि उर्वशी शर्मा (राजस्थान) प्रशिक्षक : केतन त्रिवेदी (गुजरात), व्यवस्थापक : ज्योती साहू (झारखंड).