…म्हणून अॅलिस्टर कूकला इशांत शर्माची विकेट घेतल्याचा झाला पश्चाताप

इंग्लंडचा महान फलंदाज अॅलिस्टर कूकने सोमवारी (3 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहिर केले आहे. 7 सप्टेंबरपासून सुरु होणारा इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना कूकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

कूकने निवृत्तीचा निर्णय जाहिर केल्यानंतर तो आज (5 सप्टेंबर) पहिल्यांदाच पत्रकारांच्या समोर आला होता. यावेळी त्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्याने इशांत शर्माला बाद करण्याचा पश्चाताप होत असल्याचेही गमतीने म्हटले आहे.

तो म्हणाला, “मला पश्चाताप आहे की मी इशांत शर्माला बाद करत माझी पहिली विकेट घेतली. कारण मागील काही मालिकांपासून तो याचा सतत बदला घेत आहे.”

कूकने इशांतला जूलै 2014 मध्ये ट्रेंट ब्रिजवर झालेल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी बाद केले होते. ही कूकची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली आणि एकमेव विकेट आहे. हा सामना अनिर्णित राहिला होता.

तसेच इशांतने आत्तापर्यंत कूकला 11 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये बाद केले आहे. कूकला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करण्यात इशांत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात पहिल्या क्रमांकावर मोर्ने मॉर्केल असून त्याने कूकला 12 वेळा बाद केले आहे.

कूकने आत्तापर्यंत 160 कसोटी सामने खेळले असून यात त्याने 44.88 च्या सरासरीने 32 शतके आणि 56 अर्धशतकांसह 12,254 धावा केल्या आहेत.

तसेच वनडेमध्ये त्याने 92 सामन्यात 3204 धावा केल्या आहेत. याबरोबरच तो 4 टी20 सामने खेळला असून त्यात त्याने 61 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: यष्टीरक्षक इशान किशनची एमएस धोनी स्टाईल किपिंग

भारताचा वेगवान गोलंदाज आरपी सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

राफेल नदालचा युएस ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश