अॅलिस्टर कूकच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (4 सप्टेंबर) भारताविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा 13 जणांचा संघ घोषित केला आहे. या संघातून जेम्स विन्सला वगळण्यात आले आहे. हा सामना 7 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे.

हा सामना इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकचा शेवटचा कसोटी सामना असणार आहे. तो या सामन्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचे त्याने सोमवारी जाहिर केले होते. त्याचाही या 13 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून या 5 सामन्याच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

त्यामुळे कदाचीत इंग्लंड त्यांचा या मालिकेनंतर करणार असलेला श्रीलंका आणि विंडिज दौरा लक्षात घेऊन या पाचव्या कसोटीत काही वेगळे प्रयोग करण्याचा विचार करु शकतात.

इंग्लंडला वरच्या फळीतील फलंदाजांच्या फॉर्मचा प्रश्न सध्या सतावत आहे. सलामीवीर केटन जेनिंग्जला त्याच्या मागील 9 कसोटीत एकदाही अर्धशतक करता आलेले नाही. तर कर्णधार जो रुटची चौथ्या क्रमांकालाच पसंती असल्याचे स्पष्ट केले आहे.

तो चौथ्या कसोटीतही चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. तर मोईन अलीला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली होती.

त्यामुळे इंग्लडसाठी युवा खेळाडू आॅली पोप हा एक पर्याय आहे. पण त्याने आत्तापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कधीही पहिल्या तीन क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही.

असा आहे इंग्लंडचा पाचव्या कसोटीसाठी संघ- 

जो रुट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, अॅलिस्टर कूक, सॅम करन, केटन जेनिंग्ज, आॅली पोप, आदील रशीद, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाच्या पराभवानंतर काही मिनिटातच केलेल्या ट्विटमुळे केएल राहुल झाला ट्रोल

टॉप 5: अॅलिस्टर कूकच्या नावावर आहेत हे खास विक्रम

सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली…!!!