दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकने शेवटच्या सामन्यासाठी केला भुयारी रेल्वेने प्रवास

इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूक हा जसा त्याच्या अफलातून फलंदाजीसाठी ओळखला जातो तसा तो त्याच्या साधेपणासाठीही ओळखला जातो.

त्याचा हा साधेपणा त्याच्या शेवटच्या कसोटीआधी दिसून आला आहे. ज्यावेळी सध्याच्या काळात अनेक क्रिकेटपटू महागड्या गाड्या वापरताना दिसतात तिथे कूकने ओव्हल मैदानावर जाण्यासाठी लंडनमधील ट्यूबमधून म्हणजेच भुयारी रेल्वेने जाण्याचा मार्ग निवडला आहे.

त्याने या रेल्वेने वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि अोली पोप, केटन जेनिंग्ज यांसारख्या  अन्य संघसहकाऱ्यांसह ओव्हल मैदानावर येण्यासाठी प्रवास केला.

इंग्लंड संघातील एका सदस्याने टाइम्स आॅफ इंडियाशी बोलताना कूकबद्दल सांगितने की “कूकने कसोटी सामना खेळण्यासाठी ट्यूबने (भुयारी रेल्वे) जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. हा त्याचा मैदानावर जाण्याचा सोयीस्कर मार्ग आहे.”

तसेच अशा वेळी चाहत्यांचा त्रास होतो का असे विचारल्यावर तो म्हणाला ‘भारतीय चाहते आणि इंग्लिश चाहते हे सारखे नाही, हे तूम्ही समजू शकता. नक्कीच चाहते सेल्फी घेण्यासाठी विचारतात पण कूकही त्यांना नाराज केले नाही.’

शुक्रवारी कूकने घरी जाण्यासाठी एक रेल्वे बदलली आणि जेव्हा तो त्याच्या ठिकाणी पोहचला तेव्हा रेल्वे कंपार्टमेंटमध्ये असणाऱ्या लोकांनी उभे राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. याबद्दल सूत्रानी सांगितले की “कूकला लोकांनी दाखवलेला प्रेमळपणा आवडला. असे कूक अन्य सामन्यांसाठीही करेल. ”

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

युएस ओपन: नोवाक जोकोविच आणि डेल पोट्रो यांच्यात रंगणार अंतिम सामना

भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक यशस्वी ठरलेला वेगवान गोलंदाज अँडरसनला झाली मोठी शिक्षा

जेव्हा मी कोर्टवर प्रवेश केला तेव्हा मी सेरेनाची चाहती नव्हते- नाओमी ओसाका