जेव्हा दोन सख्खे भाऊच लढतात टेनिस कोर्टवर

वॉशिंग्टन ओपन (सीटी ओपन) मध्ये अलेक्झांडर झ्वेवरेवने मिशा झ्वेवरेवला 6-3, 7-5 असे पराभूत केले. तब्बल 539 सामने खेळलेले हे दोन्ही भाऊ प्रथमच आमने सामने आले होते.

झ्वेवरेव बंधू याआधी दोन सामन्यात एकमेंकाविरोधात खेळले असून सहा वर्षे आधी एटीपी चॅंलेजरच्या वेळी झालेला हा सामना अलेक्झांडरने जिंकला होता. तर 2014ला फॅयझ सॅरोफिम आणि युएस मेन्स क्ले कोर्ट चॅम्पियनशीपमध्येही खेळले आहेत.

तसेच अलेक्झांडरने कधीच विरोधी खेळाडूला आलिंगन दिले नव्हते. तर मिशानेही कधी पराभूत झाल्यानंतर आनंद व्यक्त केला नव्हता.

“जेव्हा सामना संपला तेव्हा प्रेक्षक आमच्यासाठी चियर करत होते, त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू आले”, असे मिशा म्हणाला.

“या सामन्याच्या वेळी पंच मोहमद फितौही मला साशा झ्वेवरेव म्हटले होते.” असे मोठा भाऊ मिशा पुढे म्हणाला.

साशा हे अलेक्झांडर झ्वेवरेवचे टोपन नाव आहे.

तसेच दोन बंधू समोर यायची ही पहिलीच वेळ नाही. 2016च्या जेनेराली ओपनमध्ये गेराल्ड मेल्झेरने जर्जेन मेल्झेरला पराभूत केले होते. या स्पर्धेत मिशाचे मानांकन हे 15वे तर साशाचे पहिले आहेत.

टेनिस जगात झ्वेवरेव बंधू बरोबर विलियम्स भगिनी आणि मॅकनोर बंधू आहेत. पण या व्यावसायिक खेळात एकाच कुटुंबातील सदस्याने चांगली कामगिरी फक्त झ्वेवरेव बंधूंनी केली आहे. हे दोघेही फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत पोहचले होते. 39 वर्षानंतर असे पहिल्यांदाच घडले होते.

तसेच पुरूष दुहेरीत या दोघांनी पहिले मानांकन असणाऱ्या ऑलिव्हर मॅराच आणि मेट पॅविचला 6-1, 6-4 ने पराभूत केले होते.

साशाचा पुढील सामना 7व्या मानांकन असलेल्या केई निशीकोरी विरुद्ध आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

पहाटे ३ वाजता संपला सामना, खेळाडूने मैदानातच केली रडायला सुरूवात

कभी कभी लगता हैं कोहली ही भगवान हैं