कोर्टवरच टॉप बदललेल्या अॅलिझ कॉर्नेटची यूएस ओपनला मागावी लागली माफी

यूएस ओपन 2018 सध्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीबरोबरच फ्रेंच टेनिस स्टार अॅलिझ कॉर्नेटने कोर्टवरच टॉप बदलल्यामुळे तिला देण्यात आलेल्या ताकिदीमुळे चर्चेत आहे. मात्र आता तिची यूएस ओपन आयोजकांनी माफी मागितली आहे.

मंगळावारी कॉर्नेटचा दुहेरीचा सामना सुरु असताना तिने ब्रेक दरम्यान आपला टॉप बदलला पण तिला कोर्टवर परत आल्यावर तो टॉप उलटा घातला असल्याचे जाणवले.

त्यामुळे तिने त्वरित कोर्टवरच तिचा टॉप सरळ करुन घातला. त्यामुळे तीला चेअर अंपायरने नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत ताकिद दिली.

वर्ल्ड टेनिस असोसिएशनच्या नियमावली प्रमाणे कोर्टवर महिला खेळाडूंना कपडे बदलण्यास परवानगी नाही. मात्र पुरुष खेळाडूंना त्याची परवानगी आहे.

या लैगिंक भेदभावामुळे तसेच कॉर्नेटला दोषी ठरवल्याबद्दल सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली आहे.

यावर वायरल झालेल्या ट्विटमध्ये स्कॉटिश टेनिस प्रशिक्षक जुडी मरे यांनी म्हटले आहे की 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर अॅलिझ कॉर्नेट कोर्टवर आली. त्यावेळी तिचा शर्ट पूर्णपणे फ्रेश होता. तो तिने कोर्टच्या मागे बदलला. तर नियमाचे उल्लंघन झाले. 

खिलाडूवृत्तीला हे धरुन नाही. पण पुरुष खेळाडू मात्र कोर्टवर शर्ट बदलू शकतात.

यावर आॅस्ट्रलिया टेनिस खेळाडू केसी डेलॅक्वानेही कमेंट करत हे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

हा प्रकार घडल्यानंतर यूएस ओपन आयोजकांनी तिची माफी मागितली आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, “काल कॉर्नेटवर नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप झाल्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. सुदैवाने तिला फक्त ताकिद देण्यात आली आणि कोणताही दंड ठोठालला गेला नाही.”

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाने २० वर्षांनंतर केला अंतिम फेरीत प्रवेश

पहिल्याच दिवशी काही मिनीटांत इशांतचा कसोटीत मोठा पराक्रम

एशियन गेम्स: स्वप्ना बर्मनने मिळवून दिले भारताला हेप्टॅथलॉनमधील पहिले सुवर्णपदक