अखिल भारतीय मेजर पोर्ट हॉलीबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात

मुंबई बंदर स्पोर्ट्स क्लबच्या विद्यमाने आणि अखिल भारतीय मेजर पोर्ट स्पोर्ट्स बोर्डच्या मान्यतेने दि.१३ ते १५ मार्च २०१९ या कालावधीत “अखिल भारतीय मेजर पोर्ट हॉलीबॉल स्पर्धेचे” आयोजन करीत आहे. या स्पर्धेत देशभरातून ९मेजर पोर्ट क्लबच्या संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविली जाईल.

वेलफेअर सेंट्रल ग्राउंड, नाडकर्णी पार्क,वडाळा (पूर्व),मुंबई येथे ही स्पर्धा सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात खेळविण्यात येईल.

या स्पर्धेचे उदघाटन बुधवार दि. १३मार्च रोजी सकाळी ८-००वा. मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन संजय भाटिया यांच्या हस्ते व मुंबई बंदर स्पोर्ट्स बोर्डचे चेअरमन राजेंद्र पी. पैभीर यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मुंबई मेजर पोर्ट बोर्डचे संयोजक समितीचे सचिव रुबी कुरेशी यांनी दिली.