प्रो कबड्डीसाठी ५ फेब्रुवारीला मुंबईत पंचांची ट्रायल्स

प्रो कबड्डीचा सातवा मोसम १९ जूलै २०१९ पासून सुरु होणार आहे. त्यामुळे त्याची तयारी सुरु झाली असून त्यासाठी कबड्डी पंचांसाठी २०१९ ची ऑल इंडिया रेफ्री ट्रायल्स ५ आणि ६ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहेत. यासाठी नोंदणीही ट्रायल्सच्या दिवशीच केली जाणार आहे.

पंचाची ट्रायल्स महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, शिवाजी पार्क, दादर मुंबई येथे सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहेत. यावेळी पंचांनी ओळखपत्र म्हणून त्यांचे आधार कार्ड, पासपोर्ट किंवा मतदान ओळखपत्र बरोबर आणणे गरजेचे असेल.

त्याचबरोबर या ट्रायल्ससाठी काही पात्रता निकष असणार आहेत. या पात्रता निकषाप्रमाणे पंचाचा जन्म १ जानेवारी १९७९ नंतर झालेला असावा. त्याचबरोबर पंचांनी भारतीय हौशी कबड्डी महासंघाची पंचासाठी असलेली राष्ट्रीय पंच परिक्षा पास केलेली असावी. तसेच पंचाकडे कबड्डीचे ज्ञान आणि काही कबड्डी सामन्यांत पंच म्हणून काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

त्याबरोबरच पंचांना या ट्रायल्ससाठी क्रिडा पोषाखात(टी-शर्ट/ट्रॅक सूट) यावे लागेल. तसेच पंचाना त्यांच्या नोंदणीनंतर त्यांच्या वेळेच्या स्लॉटची माहिती दिली जाईल. त्यामुळे दिलेल्या वेळेपेक्षा ४५-६० मिनिटे पंचानी लवकर येणे अपेक्षित असेल. या ट्रायल्ससाठी आलेल्या पंचाची डोपिंग चाचणी सिलेक्शन पॅनलच्या निर्णयानुसार केली जाईल.

या ट्रायल्ससाठी येण्या-जाण्याचा खर्च पंचांना स्वत: करावा लागणार आहे. तसेच या ट्रायल्सच्या पात्रता निकषाप्रमाणे निवड झालेल्या उमेदवार पंचाची पुढील टप्प्याची माहिती आयोजकांकडून दिली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

जय बजरंग, ओम काल्हेर, जय शिव, बंड्या मारुती संघांचा बाद फेरीत प्रवेश

प्रो कबड्डीसाठी युवा खेळाडूंची निवड चाचणी ५ फेब्रुवारी पासून