उद्या सुरु होणाऱ्या प्रो-कबड्डी लिलावापुर्वी ह्या ५ गोष्टी नक्की माहित करुन घ्या!

मुंबई | प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाचा लिलाव ३० आणि ३१ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. एकूण ४२२ खेळाडू यंदाच्या हंगामात लिलावाच्या प्रक्रियेमधून जाणार आहे. त्यात अनेक दिग्गजांचाही समावेश आहे. या लिलावापुर्वीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी-

एक संघ किती खेळाडूंना घेऊ शकतो?

एक संघ १८ ते २५ खेळाडू संघात घेऊ शकतो. यावेळी ४२२ खेळाडू लिलासाठी उपलब्ध आहेत. यावेळी १५ देशांतील संघ स्पर्धेत भाग घेत आहेत. हा प्रो-कबड्डी इतिबासातील सर्वात मोठा लिलाव आहे.

एक संघ किती रुपये खर्च करु शकतात?

एक संघ खेळाडूंच्या बोलीवर जास्तीत जास्त ४ कोटी रुपये खर्च करु शकतो. यावेळी १२ संघ स्पर्धेत भाग घेत आहेत. त्यात यु-मुंबा आणि युपी योद्धाज संपुर्ण संघाची नव्याने बांधणी करणार आहेत. त्यांनी कोणत्याही खेळाडूला कायम केले नाही.

कोणते खेळाडू संघांनी लिलावापुर्वीच संघात कायम केले आहेत?

पाटणा पायरेट्स : प्रदीप नरवाल, जयदीप, जवाहर डागर, मनीष कुमार
पुणेरी पलटण : संदीप नरवाल, राजेश मोंडल, जी. बी. मोरे, गिरीश ईर्नाक
गुजरात फॉर्च्यूनजायंट्स : सचिन, सुनील कुमार, महेंद्र रजपूत
तामिळ थलायव्हास : अजय ठाकूर, अमित हुडा, सी. अरुण
तेलुगू टायटन्स : नीलेश साळुंखे, मोहसीन मॅघसॉडलो जाफारी
बंगाल वॉरियर्स : सुरजीत सिंग, मणिंदर सिंग
बेंगळूरु बुल्स : रोहित कुमार, हरीश नाईक, सुमीत मलिक
दबंग दिल्ली : मेराज शेख
हरयाणा स्टीलर्स : कुलदीप सिंग
जयपुर पिंक पॅंथर: नितीन रावल

जुन्या खेळाडूंना संघ कसे परत घेऊ शकतात-

फ्रँचायजीजने पूर्वीचे ४ इलायीट खेळाडू कायम केलेले असतील तर त्यांना लिलावात एका वेळेस “फायनल बीड मॅच” चा पर्याय वापरता येणार आहे. यात फ्रँचायजीज आपल्या पूर्वीच्या पण कायम न केलेल्या खेळाडूवर लागलेल्या महत्तम बोली इतकी बोली लावून त्या खेळाडूला पुन्हा आपल्या संघात घेऊ शकते. जर फ्रँचायजीजने ४ पेक्षा कमी खेळाडू कायम केलेले असतील तर त्यांना दोनदा ” फायनल बीड मॅच” चा पर्याय वापरता येईल.

यावेळी नक्की काय वेगळ आहे लिलावात-

यावेळी तब्बल ३००० खेळाडूंची निवड चाचणी १८ वेगवेळ्या शहरात घेण्यात आली. ८७ खेळाडू हे यावेळी एकूण ४२२ खेळाडूंमधील ५८ खेळाडू विदेशी असतील तर ८७ खेळाडू हे “फ्युचर कबड्डी हिरोज(FKH)” या राष्ट्रीय प्रतिभा शोध कार्यक्रमातील असतील.

परदेशी खेळाडूंबद्दल-

५८ खेळाडू हे परदेशातील १४ देशांमधून उद्या लिलावात नशीब आजमावताना दिसतील. कोरीया, इराण, इराक, बांग्लादेश, केनिया, इंडोनेशिया, श्रीलंका, जपान, ओमान, पोलंड, नेपाळ, थायलंड, माॅरिशस या देशातील असतील.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली

या दिग्गज माजी खेळाडूची पुणेरी पलटणच्या प्रशिक्षकपदी निवड

महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली

संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध

आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम

कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक

प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम