श्रीलंका संघ ९६ धावांत गारद

दुबई । येथे सुरु असलेल्या पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात श्रीलंका संघ ९६ धावांवर बाद झाला आहे. विशेष म्हणजे ह्याच संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४८२ धावा केल्या होत्या.

श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडताना वहाब रियाझने ४ तर हॅरिस सोहेलने ३ बळी मिळवले. श्रीलंका संघाचे केवळ ४ खेळाडू दोन आकडी धावसंख्या उभारू शकले. कुशल मेंडिसने श्रीलंका संघाकडून सर्वाधिक धावा करताना २९ धावांची खेळी केली.

या सामन्यात हॅरिस सोहेलने एकाच षटकात ३ विकेट्स घेतल्या आणि त्याने संपूर्ण सामन्यात केवळ एकच षटक टाकले.

संक्षिप्त धावफलक:
श्रीलंका पहिला डाव सर्वबाद ४८३ आणि दुसरा डाव सर्वबाद ९६
पाकिस्तान पहिला डाव सर्वबाद २६२

पाकिस्तान संघाला जिंकण्यासाठी ३१७ धावांची गरज आहे.