भुवीला संधी नाही, काय चेष्टा आहे; माजी क्रिकेटपटू संघ निवडीवर चांगलाच नाराज

मुंबई । भारतीय संघाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघातून बाहेर ठेवल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज अॅलन डोनाल्डने जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही भुवीला बाहेर ठेवून चेष्टा करत आहात काय असेही त्याने म्हटले आहे.

केपटाउन टेस्टमध्ये भुवनेश्वरने जबदस्त गोलंदाजी केली होती. तरीही त्याला सेंचुरियन टेस्टमध्ये संधी देण्यात आली नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसह अनेक मोठ्या क्रिकेट पंडितांसाठी हा निर्णय मोठा धक्का होता. केपटाउन टेस्टमध्ये भुवीने आघाडीच्या फलंदाजांना तर बाद केलेच होते तसेच फलंदाजीतही योगदान दिले होते.

अॅलन डोनाल्ड यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त करताना ही चेष्टा तर नाही ना? असेही विचारले आहे.

भुवीला संघातून बाहेर ठेवणे म्हणजे व्हेरनॉन फिलेण्डरला दक्षिण आफ्रिकेने संघाबाहेर ठेवणे असे आहे असेही ते पुढे म्हणाले.