आल्वोरो मोराटा म्हणतो चेल्सी सोबत करेन १० वर्षाचा करार

चेल्सी संघाचा स्टार स्ट्रायकर आल्वोरो मोराटा या मोसमात चेल्सी संघासाठी खूप फायदेशीर खेळाडू ठरत आहे. या मोसमात नव्याने या संघासोबत जोडला जाऊन देखील त्याने खूप लवकर चेल्सी संघाच्या खेळाच्या शैलीशी जुळवून घेतले आहे. परिणामी तो चेल्सी संघाच्या पाठिराख्यांचा आवडता खेळाडू बनला आहे.

चेल्सीच्या या २५ वर्षीय स्पॅनीश स्ट्रायकरचा चॅम्पियन्स लीगच्या सामन्याआधी इटलीमधील वर्तमानपत्र गॅझेटा डेल्लो स्पोर्ट यांच्यानुसार आल्वोरो मोराटा हा इंग्लंडच्या राजधानीमधील क्लब चेल्सीशी जुळवून घेता येत नाही. त्यांच्यात “प्रॉब्लेम ऑफ अंडरस्टँडींग” आहे. बुधवारी होणाऱ्या ‘एएस रोमा’विरुद्धच्या चॅम्पियन्स लीगच्या सामन्याअगोदर झालेल्या प्रत्रकार परिषदेत मोराटाने चेल्सी संघविषयीची मते मांडली.

मोराटा म्हाणाला, “जर चेल्सीने माझ्या समोर १० वर्षाच्या कराराचा प्रस्ताव मांडला तर तो देखील मी शक्यतो स्वीकारू शकतो.”

“मी या क्लब सोबत खूप आनंदी आहे, मी या शहरासोबत खूप आनंदी आहे, मी लंडन शहराच्या प्रत्येक गोष्टीबाबत आनंदी आहे. खरे तर मला लंडन खूप आवडते. जर मी येथे चांगला खेळ करू शकलो आणि नवीन गोष्टी आत्मसात करू शकलो तर मी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ येथे राहू शकतो.”

“परंतु मला येथे खूप गोल करावे लागतील. नाहीतर चेल्सी दुसरा खेळाडू विकत घेऊ शकते. हे साहजिकच आहे.”

चेल्सी संघाला चॅम्पियन लीगच्या नॉक-आऊट फेरीतील आपले स्थान दोन सामने हातात ठेऊन पात्र ठरायचे असेल तर त्यांना आजचा सामना जिंकावा लागेल. रोमा विरुद्धच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात त्यांना ३-३ असे बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.

या सामन्यात मोराटा हा खूप महत्वाचा खेळाडू ठरू शकतो. तो स्नायूंच्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. परंतु दुखापतीतून बरा होऊन परतल्यापासून तो लयीत नाही. मागील चारही सामन्यात तो गोल करण्यात अपयशी ठरला आहे.