स्टार्कशी पंगा घेतलेल्या माजी दिग्गजाला स्टार्कच्या पत्नीने खडसावले

ऑस्ट्रेलिया संघाला अॅडलेड कसोटी सामन्यात भारताकडून 31 धावांनी पराभूत व्हावे लागले. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. मिशेल जॉन्सने मिशेल स्टार्कच्या गोलंदाजी नेहमीप्रमाणे नाही झाली असे म्हणत त्याला लक्ष्य केले आहे.

जॉन्सनने ट्विट करत भारताला विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले असून त्यात ऑस्ट्रेलियाला पर्थ येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करा असेही म्हटले आहे.

जॉन्सनचे हे ट्विटला मात्र स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक एलिसा हेलीला खटकले. तिने जॉन्सनच्या ट्विटला स्टार्कला टॅग करत ‘तुम्ही काही वेगळी तयारी करणार आहे का, हा प्रश्न विचारला आहे.’

अॅडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न यांनीही स्टार्कच्या गोलंदाजीवर चिंता व्यक्त केली आहे.

“स्टार्क एक उत्तम गोलंदाज असून तो फार काळ संघाच्या बाहेर होता. यामुळे त्याच्या गोलंदाजीत वेगळेपण आले आहे. पण त्याला सूर गवसला तर तो नक्कीच चांगला खेळेल”, असे वॉर्नने स्टार्कच्या गोलंदाजीबाबत म्हटले आहे.

स्टार्कने अॅडलेड कसोटीत पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 3 अशा 5 विकेट्स घेतल्या होत्या.

14 डिसेंबरला दुसरा कसोटी सामना पर्थ येथे होणार आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व आत्तापर्यंत राहिले आहे. त्यामुळे जॉन्सनने वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कला मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

स्टार्कबद्दल बोलताना जॉन्सन म्हणाला की, “स्टार्कच्या मनात कसलातरी गोंधळ सुरु आहे. असे वाटत आहे की त्याच्या मनात काहीतरी सुरु आहे. ज्यामुळे त्याला फायदा होत नाहीये. त्यामुळे आशा आहे की पर्थ कसोटी आधी आम्ही एकमेकांशी चर्चा करु.”

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारणही आहे तसचं काहीस वेगळं

हॅपी बर्थडे युवी… !

गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या खेळाडूचा आयपीएलला बाय बाय