सुदेश शेलार मेमोरियल करंडक राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत ऍन्थोनी अमलराज, सुतिर्था मुखर्जी, जित चंद्रा, अकुला श्रीजायांना अग्रमानांकन

पुणे | सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 6व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्ट्स राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरूष गटात पीएसपीबीच्या ऍन्थोनी अमलराज,  महिला गटात एचआरएनच्या सुतिर्था मुखर्जी, 21 वर्षाखालील मुलांच्या गटात एचआयएनच्या जित चंद्रा तर 21 वर्षाखालील मुलींच्या गटात  आरबीआयच्या अकुला श्रीजा यांना अग्रमानांक देण्यात आले आहे.

पुरूष गटात पीएसपीबीच्या  सुधांशू ग्रोवरला दुसरे तर एएआयच्या अर्जुन घोषला तीसरे मानांकन देण्यात आले आहे. महिला गटात पीएसपीबीच्या मनिका बात्रा व पुजा सहस्त्रबुध्दे याना अनुक्रमे दुसरे व तीसरे मानांकन देण्यात आले आहे.

ही स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये उद्यापासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा 12,15,18, 21 वर्षाखालील, वरिष्ठ, पुरूष व महिला खुला गट अशा विविध गटांत होणार आहे. स्पर्धेत देशभरांतून 1200 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून टेबल टेनिसविषयी खेळाडूंचा वाढता प्रतिसाद यातून लक्षात येतो.

11स्पोर्ट्सच्या विता दाणी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन व आशियाई व राष्ट्रकूल स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात  येणार आहे.

गटवार मानांकन असे :  

पुरूष गट-1.  ऍन्थोनी अमलराज(पीएसपीबी), 2. सुधांशू ग्रोवर(पीएसपीबी), 3. अर्जुन घोष(एएआय), 4. सनिल शेट्टी(पीएसपीबी),5. श्रीराम सुष्मित(एएआय), 6. सिध्देश पांडे(एमएचआर बी), 7. मनुष शहा(गुजरात), 8. हरमीत देसाई  (पीएसपीबी)

महिला गट- 1. सुतिर्था मुखर्जी(एचआरएन), 2. मनिका बात्रा(पीएसपीबी), 3. पुजा सहस्त्रबुध्दे(पीएसपीबी), 4. मधुरीका पटकर(पीएसपीबी), 5. दिव्या देशपांडे(पीएसपीबी), 6. अहियाका मुखर्जी(आरबीआय), 7. सागरीका मुखर्जी(आरएसपीबी), 8. प्राप्ती सेन(पश्चिम बंगाल)

21 वर्षाखालील मुले- 1. जित चंद्रा(एचआयएन), 2. अनिरभ घोष(आरएसपीबी), 3. पार्थ विरमानी(डीएलआय), 4. सिध्देश पांडे(एमएचआर बी), 5. अभिमन्यु मित्रा(आयए ऑड एडी), 6. मानुष शाह(गुजरात), 7. आनंत देवराजन(तमिळनाडू), 8. सोहम भट्टाचार्य(सीबी)

21 वर्षाखालील मुली- 1. अकुला श्रीजा(आरबीआय), 2. सेलेनेदिप्ती सेल्वाकुमार(एएआय), 3. श्रृती अमृते(आरएसपीबी), 4. प्राप्ती सेन(पश्चिम बंगाल), 5. याशीनी शिवशंकर(तमिळनाडू), 6. मौमीता दत्ता(एएआय), 7. वंशीका भार्गव(डीएलआय), 8. कौशानी नाथ(एएआय)

महत्वाच्या बातम्या-