अमनोरा करंडक बॅडमिंटन स्पर्धा- रिया हब्बूने पटकावला दुहेरी मुकुट

पीवायसी-हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजन

पुणे । रिया हब्बू हिने पीवायसी आणि हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशन आयोजित अमनोरा कप बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले. तिने स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुली आणि १९ वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवले.

पीवायसी हिंदू जिमखानाच्या बॅटमिंटन कोर्टवर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत रियाने दुसऱ्या मानांकित शताक्षी किणीकरवर २१-१८, २१-९ अशी मात केली. यानंतर रियाने १९ वर्षांखालील मुलींच्या गटाचेही जेतेपद मिळवले. तिने अंतिम फेरीत ज्ञानेश्वरी फाळकेवर २१-२, २१-१० असा सहज विजय मिळवून दुहेरी यश संपादन केले.

पार्थ, आर्यचे दुहेरी यश
पार्थ घुबे आणि आर्य ठोकोरे यांनी या स्पर्धेत दुहेरी यश मिळवले. पार्थने १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद मिळवले. १७ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित पार्थ-आयुष खांडेकर जोडीने सस्मित पाटील-वेंकटेश अगरवाल जोडीवर १३-२१, २१-८, २१-१९ असा विजय मिळवला. आयुषने १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीचे विजेतेपद मिळवले असल्याने त्याचेही दुहेरी यश निश्चित झाले. यानंतर पार्थने १९ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत तेजस चितळेसह खेळताना आदित्य ओक-पार्थ थट्टे जोडीवर २१-११, २१-१५ असा विजय मिळवला.

आर्यने १७ वर्षांखालील मुलांच्या मिश्र दुहेरी आणि – गटाचे विजेतेपद मिळवले. १७ वर्षांखालील मुलांच्या मिश्र दुहेरीत आर्य – रुचा सावंत जोडीने पार्थ कड-साद धर्माधिकारी जोडीवर २१-१०, २१-१३ अशी मात केली. यानंतर आर्यने ध्रुव ठाकोरेसह १५ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीतून त्यांची प्रतिस्पर्धी जोडी रोनक गुप्ता-सुवीर प्रधान यांनी माघार घेतल्याने आर्य-ध्रुवचे विजेतेपद निश्चित झाले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी पीवायसी क्लबचे अध्यक्ष सुधीर भाटे, पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश जाधव, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व्लादिमीर इव्हानो, कुमार लक्षसेन, बॅडमिंटन प्रशिक्षक आनंद पवार, पुणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष अण्णा नातू , पीवायसीचे क्रीडा विभाग सचिव तन्मय आगाशे, स्पर्धेचे संयोजन सचिव उदय साने , पीवायसीचे आनंद परांजपे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कुमार ताम्हणे, उपस्थित होते.

रिया हब्बू हिला यावेळी बॅडमिंटन खेळासाठी ५० हजार रुपयांची स्कॉलरशिप देण्यात आली. स्पर्धेतील तसेच वर्षभरातील बॅडमिंटन खेळातील कामगिरी पाहून तिची स्कॉलरशिपसाठी निवड करण्यात आली. अमनोरा आणि योनेक्स यांचे स्पर्धेला सहकार्य मिळाले.निकाल :

१७ वर्षांखालील मुली – उपांत्य फेरी – शताक्षी किणीकर वि. वि. श्रेया शेलार २१-१०, २१-१३; रिया हब्बू वि. वि. ज्ञानेश्वरी फाळके २१-४, २१-७.

११ वर्षांखालील मुली एकेरी – अंतिम फेरी – सुखदा लोकापुरे वि. वि. इकिशा मेदाने २१-१०, १९-२१, २१-१८. मुले – अवधूत कदम वि. वि. सार्थक पाटणकर २१-१७, २१-१५.

१३ वर्षांखालील मुले – अंतिम फेरी – आद्य पारसनीस वि. वि. अर्जुन भगत २१-१४, २१-१२.

१५ वर्षांखालील मुले – अंतिम फेरी – प्रथम वाणी वि. वि. सुवीर प्रधान २१-१४, १२-६ (जखमी होऊन निवृत्त)

१५ वर्षाखालील मुली दुहेरी – अंतिम फेरी – सानिका पाटणकर – संजना अंबेकर वि. वि. अनन्या अगरवाल-ओजल रजक २१-१५, २१-११.

१७ वर्षांखालील मुले – अंतिम फेरी – आयुष खांडेकर वि. वि. प्रतीक धर्माधिकारी २१-१४, २१-१८.

१९ वर्षांखालील मुली – उपांत्य फेरी – रिया हब्बू वि. वि. नव्या करलिंगान्नवर २१-९, २१-७; ज्ञानेश्वरी फाळके वि. वि. सारा नव्हरे १८-२१, २१-१५, २१-१०.

१९ वर्षांखालील मुले – अंतिम फेरी – प्रतीक धर्माधिकारी वि. वि. सोहम नवंदर २१-१६, १९-२१, १४-२ (जखमी होऊन निवृत्त)

महिला एकेरी – अंतिम फेरी – आदिती काळे वि. वि. कल्याणी लिमये २१-१७, ८-२१, २२-२०.

पुरुष एकेरी – अंतिम फेरी – वसीम शेख वि. वि. विनीत कांबळे १६-२१, २१-१९, २२-२०.

३० वर्षांखालील महिला एकेरी – अंतिम फेरीत – संध्या मेलशिमी वि. वि. आरती सिनोजिया २१-१४,२१-१३.